Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आडते बाजार मर्चंट असो. तर्फे पोलीसांसाठी मास्क व सॅनीटायझरचे जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते वाटप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
अहमदनगर – सध्याच्या काळत कोरोना विषाणूच्या विरोधात सर्व पातळीवर प्रयत्न सुरु असून नागरिकांच्या सुर्क्षिततते साठी सतत कार्यरत शहर व जिल्ह्यातील पोलीस बांधवांचे आरोग्य जोपासले पाहिजे, ही आपली सामाजिक जबाबदारी मानून या सर्वांना आडते बाजार मर्चंट असो.अहमदनगर तर्फे मास्क व सॅनीटायझरचे जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते  मोफत वाटप मोहीम सुरु करण्यात आली.

आडते बाजार मर्चंट असो.चे प्रवीण गांधी, ललित गुगळे, मूर पितळे, निलेश पटवा, महावीर गांधी यांनी मास्क व सॅनीटायझर  जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या कडे सुपूर्त केले.यावेळी ए.पी.आय.पल्लवी, उंबरहंडे , आर.डी.वाघ, योगिता साळवी उपस्थित होते.
असो.चे अध्यक्ष राजेंद्र चोपडा यांनी दूरध्वनीवर मणीज पाटील यांच्याशी संवाद साधून कोरोना विरीधी लढ्यात असोसीएशनचे पूर्ण सहकार्य राहील याची ग्वाही दिली. तसेच यापुढेही सर्व व्यापारी गरज भासल्यास मदतीसाठी तत्पर राहतील असेही सांगितले.
आलेले संपूर्ण साहित्य रस्त्यावर बंदोवस्त करणाऱ्या कर्मचार्या पर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. पाटील यांनी तातडीने विशेष मोहीम राबविल्या बद्दल असो. तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

  

 
Post a Comment

0 Comments