Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी येथे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची शनिवारी आढावा बैठक

 

मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि फळपीक विम्याबाबत
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर :  महाराष्ट्र राज्याचे नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 26 जून 2021 रोजी सकाळी  9.15 वाजता कार्यालयीन कामकाजासाठी राखीव. सकाळी 9.30 वाजता निवासस्थान राहुरी येथून शासकीय वाहनाने पाथर्डीकडे प्रयाण. सकाळी  11 वाजता पाथर्डी येथे आगमन व मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यकारिणी आढावा बैठक (  स्थळ- पंचायत समिती, पाथर्डी). सकाळी  11.45 वाजता पंचायत समिती पाथर्डी येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह पाथर्डीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह पाथर्डी येथे आगमन

व फळ पिक विमाबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांची आढावा बैठक. ( स्थळ- शासकीय विश्रामगृह, पाथर्डी) दुपारी  1 वाजता उच्च दाबाची वीज वाहिनी (टॉवर लाईन) नुकसान भरपाई व नुकसान पंचनामे बाबत बैठक. स्थळ- शासकीय विश्रामगृह, पाथर्डी. दुपारी 1.30 ते 3 वा. राखीव. दुपारी 3 वाजता पाथर्डी येथून शासकीय वाहनाने तिसगाव ता. पाथर्डीकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता तिसगाव येथे आगमन व लवांडे ॲग्रो इंडस्ट्रीजचे उदघाटन समारंभास उपस्थिती. दुपारी  3.40 वाजता तिसगाव येथे सांत्वनपर भेटी. सायंकाळी  6 वाजता तिसगाव येथून शासकीय वाहनाने राहुरीकडे प्रयाण. रात्रौ  7 वाजता निवासस्थान राहुरी येथे आगमन व राखीव.  

Post a Comment

0 Comments