Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रक्तदानासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज - अभय आगरकर

 

श्री विशाल गणपती मंदिर व ज्ञानदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - रक्तदानासारखे पुण्यकर्म नाही, आपण केलेल्या रक्तदानामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात, त्यासाठी प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. रक्तदान केल्यास अनेक आजार दूरही राहतात, त्यासाठी रक्तदान हे आवश्यक आहे. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने देवस्थान व ज्ञानदा प्रतिष्ठानने रक्तदान शिबीरासाठी घेतलेला पुढाकार हा दिशा दर्शक आहे. या उपक्रमात युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. श्री विशाल गणेशाच्या कृपाने कोरोनाचे संकट दूर होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. लवकरच सामान्य परिस्थिती निर्माण होऊन सर्व व्यवहार सुरळीत होतील. त्याचबरोबर सर्व मंदिरेही लवकरच खुली होतील. असा विश्‍वास श्रीविशाल गणेश मंदिरचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी व्यक्त केला.

श्री विशाल गणपती मंदिर व ज्ञानदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माळीवाडा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोक कानडे, ज्ञानदा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन हिरवे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.विलास मढीकर, डॉ.जी.एन. गुप्ता आदि उपस्थित होते.     याप्रसंगी देवस्थानचे विश्‍वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, गजानन ससाणे, चंद्रकांत फुलारी, ज्ञानदा प्रतिष्ठानचे अमोल जाधव, स्वप्नील गवळी, शेखर पुंड, जयदीप पादीर, शिवाजी पठारे, संदिप दळवी, महेश सोनूले, ज्ञानेश्‍वर बर्वे, विश्‍वास चेडे, वैभव भोंग, गणेश राऊत, सागर गंधारे, अनिल इंगोले, अर्जुन जाधव, प्रशांत गायकवाड, अनुराग आगरकर आदि उपस्थित होते.     प्रास्तविकात सचिन हिरवे म्हणाले, आज प्रत्येकाने आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे. आपण आपल्या दैनंदिन कामकाजातून सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहिजे. ज्ञानदा प्रतिष्ठानच्यावतीने नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. वृक्षारोपण, अन्नदान, गरजूंना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत आपले कर्तव्य पार पाडत आहे. सध्या रक्ताचा तुटवडा पाहता, रक्तदान शिबीराचे आयोजन करुन युवकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले आहे. यापुढेही असेच उपक्रम प्रतिष्ठानच्यावतीने राबविले जातील, असे सांगितले.     यावेळी डॉ.विलास मढीकर म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, आज एकाने केलेल्या रक्तदानाचा अनेक रुग्णांना उपयोग होत आहे. त्याचबरोबर रक्तदान केल्यानंतर ते पुन्हा शरीरात निर्माण होत असल्याने  युवकांनी रक्तदान हे केले पाहिजे. श्री विशाल गणेश मंदिर देवस्थान व ज्ञानदा प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबीरासाठी घेतलेला पुढाकार इतरांना प्रेरणादायी आहे, असे सांगितले.     यावेळी रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास आशा भेळ यांच्यावतीने भेटवस्तू देण्यात आली. उद्योगपती मधुकर शिंदे यांच्यावतीनेही सॅनिटझर व मास्क देण्यात आले. रक्त संकलनाचे कार्य जनकल्याण रक्तपेढीच्यावतीने करण्यात आले. या शिबीरात 65 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments