Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बिबट्याचा बंदोबस्त तातडीने करा ; निमगाव वाघा, नेप्ती ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- नगर तालुक्यातील निमगाव वाघा, नेप्ती परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे एखादी अनुचित घटना घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निमगाव वाघा, नेप्ती या गावासह परिसरातील नागरिकांनी बुधवारी (दि.१६) निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नेप्ती सरपंच सुधाकर कदम, उपसरपंच राजेंद्र होळकर, निमगाव वाघा सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच अलका गायकवाड, सदस्य नाना डोंगरे, संजय जपकर, अतुल जपकर, डाॅ.विजय जाधव, साहेबराव बोडखे, दिलावर शेख, प्रमोद जाधव, गोकुळ जाधव आदिंसह ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त त्वरित करावा, असे निवेदनात म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments