Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निमगाव वाघा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

 


गाव कोरोनामुक्त झाला असताना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत येऊन केला योग, प्राणायाम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र अहमदनगर संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे प्रात्यक्षिकासह देण्यात आले. गाव कोरोनामुक्त झाला असताना प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना सदृढ व निरोगी आरोग्यासाठी योग, प्राणायाम व ध्यानचे धडे देण्यात आले. 

योग शिक्षक डॉ.सुनिल गंधे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योग व प्राणायमाचे धडे दिले. विविध आसन प्रात्यक्षिकासह करुन, त्याचे महत्त्व विशद केले. तर योग, प्राणायम व ध्यान धारणेबद्दल माहिती देवून निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्था व वाचनालयाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, मयुर काळे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, तुकाराम खळदकर, लहानू जाधव, डोंगरे संस्था व वाचनालयाच्या सचिव मंदाताई डोंगरे, रंगनाथ शिंदे आदी उपस्थित होते. 
पै.नाना डोंगरे यांनी निरोगी जीवनासाठी योग व प्राणायाम महत्त्वाचे आहे. निसर्गाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन महत्त्वाचे आहे. वातावरण चांगले असल्यास इतर आजारांना तोंड द्यावे लागत नाही. तर नागरिकांमध्ये चांगली रोग प्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. साहेबराव बोडखे यांनी भारताची सक्षम सदृढ पिढी घडविण्यासाठी योगाची गरज आहे. कोरोना काळात भावी पिढीचे मोठे नुकसान झाले असून, युवा पिढी निरोगी व सदृढ असल्यास देशाचा विकास साधला जाणार असल्याचे सांगितले. पै. संदिप डोंगरे यांनी युवक-युवतींनी देश सक्षम व निरोगी ठेवण्यासाठी योग, प्राणायाम जीवनाचा अविभाज्य घटक बनविण्याचे आवाहन केले. योग दिवसाचा हा उपक्रम नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.  

Post a Comment

0 Comments