Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ परिसरातील मोबाईल सेवा विस्कळीत ; ट्रान्समिशन टॉवर दुरूस्ती तातडीने करावी, नागरिकांची मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी : तालुक्यातील चिंचपूर पांगुळ या ठिकाणीचे ट्रान्समिशन टॉवर गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. या कारणास्तव चार ते पाच गावांसह मोबाईल सेवा बंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने मोबाईल सेवा सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे.

भारत संचार निगम (बीएसएनएल)चे चिंचपुर पांगुळ येथील ट्रान्समिशन टॉवर गेली आठ ते दहा दिवसापासून बंद झाले आहे. त्यामुळे मोबाईल हातात असून, त्याचा उपयोग होत नाही, शिवाय बीएसएनएलच्या ऑप्टिक फायबर वरच आडिया,व्होडाफोन या कंपनीला पुरवठा होतो. त्यामुळे या हि कंपनीच्या रेंज चिंचपुर पांगुळ ,वडगांव, जोगेवाडी, माणेवाडी, ढाकनवाडी सह परिसरात नेटवर्क मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत, सततच्या होणाऱ्या बिघडास कंटाळून अनेकांनी जिओ नेटवर्क सिम घेतले आहेत, परंतु अजूनही काही ग्राहक असे आहेत की त्याना ते परवडत नाही त्यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले जाते आहे,
कारण बीएसएनएल कंपनी बंद होणार, असा इतर कंपन्या अप्रचार करत आहेत. ग्राहकही खरेखोटेपणाची शहानिशा न करता सिम बंद करतील. त्यामुळे बंद पडलेले टॉवर तात्काळ सुरू होणे आवश्‍यक आहे.
@संकलन -
पत्रकार सोमराज बडे
मोबा.९३७२२९५७५७

Post a Comment

0 Comments