Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'आमची मैत्री जंगलातल्या वाघासोबत होती, पिंजऱ्यातल्या नाही' ; चंद्रकांत पाटील

 

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली. या भेटीनंतर राज्यातील राजकारणात टीका-टप्पणी सुरू झाली आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात चांगलेच वाक् युद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावत उत्तर दिले आहे. 'आमची मैत्री जंगलातल्या वाघाची आहे, पिंजऱ्यातल्या नाही' असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलं.पुण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी 'वाघाशी मैत्री करायला तयार आहोत' असे वक्तव्य केले होते. यानंतर याचा संबंध शिवसेनेशी जोडत विविध प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून समोर येत होत्या. यानंतर संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. राऊत म्हणाले होते की, 'हे गोड आहेत त्यांनी असेच कार्यकर्त्यांशी गोड गोड वागावे, गोड बोलावे आणि कुणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो, असा टोला लगावला होता. यावरत चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'आम्ही जंगलातल्या वाघाची मैत्री करतो पिंजऱ्यातल्या नाही. सध्याची शिवसेनेची अवस्थाही पिंजऱ्यातल्या वाघा सारखी झालेली आहे. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करायची हौस नाही' असे म्हणत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की होते की, आमचे राजकीय पक्ष वेगळे असले तरी चंद्रकांत पाटील हे आमचे मित्र आहे. ते आमच्यावर टीका करता, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. पण, आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्यात, त्यांना गोडधोड खाऊ घालावे, केक कापावा, ते गोड माणूस आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असेही राऊत यावेळी म्हणाले.

Post a Comment

0 Comments