Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लाच घेताना कर्जत तालुक्यातील तलाठी रंगेहाथ पकडला

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत :-कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री गावचा तलाठी चंद्रकांत गजाबा बनसोडे यास वीस हजार रुपयांची मागणी करून त्यातील बारा हजार रु स्वीकारताना लाचलुचपत विभागाने मिरजगाव येथे रंगेहाथ पकडले आहे. वय ५६ वर्षे हा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. शेतीचे वाटणी पत्र करुन त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी त्याने २०००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १२००० रुपयांची लाच स्वीकारताना आज मिरजगाव येथे त्याला जेरबंद करण्यात आले आहे.

गुरवपिंप्री गावातील तक्रारदार यांनी त्यांचे चुलत भावा बरोबरच्या शेतीचे वाटणी पत्र करुन त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी सजा गुरवपिंप्री यांच्याकडे अर्ज दिला होता. त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी चंद्रकांत गजाबा बनसोडे रा अहमदनगर व त्याचा मदतनीस अमित सर्जेराव शिर्के (खाजगी इसम) रा चांदा खु यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, लाचलुचपत विभागाच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्र, नगर सोलापूर हायवे, मिरजगाव येथे तक्रारदार यांचे कडून तडजोडीने ठरलेली 12 हजार रु
लाच स्वीकारताना तलाठी बनसोडे यांना रंगेहाथ पकडून अटक केली. यातील तलाठी याचा मदतनीस अमित सर्जेराव शिर्के, वय ४० हा मात्र पथकाच्या हाती लागला नाही. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक दिपक करांडे तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून ला. प्र. वि. चे पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस रमेश चौधरी, पो. अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पोलीस हवा. हरुन शेख, पोलीस अंमलदार राहुल सपट यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संकलन : आशिष बोरा 

Post a Comment

0 Comments