Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पञकारावर दाखल गुन्हा रद्द व्हावा ; अहमदनगर प्रेस क्लबचे एसपी'ना निवेदन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - दै.अहमदनगर घडामोडी या वृत्तपत्राचे संपादक मनोज मोतीयानी यांच्यावर अवैध धंद्यांच्याविरोधात बातम्या छापल्याच्या रागातून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत चौकशी व्हावी, व दाखल गुन्हा रद्द व्हावा, अशी मागणी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना शनिवार (दि.१२) निवेदनाद्वारे करण्यात आली.



यावेळी अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के, उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, माजी अध्यक्ष बाबा जाधव, सुभाष चिंधे, सुभाष मुदळ, मिलिंद देखणे, राम नळकांडे, अशोक झोटिंग, मोहिनीराज लहाडे, सचिन दसपुते, अन्सर सय्यद, अमीर सय्यद, बबलू शेख, गोरक्षनाथ बांदल आदिंसह अन्य वृत्तपत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments