Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार ; बऱ्हाणपूर येथील घटना

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नेवासा - तालुक्यातील बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यात चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. 
याबाबत समजलेली माहिती अशी की, संकेत चव्हाण हे कांगोणी फाट्याकडून बऱ्हाणपूर रस्त्याने रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या घराजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. या दरम्यान दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी  गावठी कट्टयातून संकेत याच्यावर गोळी झाडली, यात ते जखमी झाले. या घटनेनंतर चव्हाण यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे. चांदा येथील घटनेस पंधरा दिवसही झाले नाही तोच बऱ्हाणपूर येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. 
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शेवगाव उपविभागीय अधिकारी सुर्दशन मुंडे, शिंगणापूर पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन बागूल आदिचे पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments