Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहरातील होलसेल बाजारपेठेचे कामकाज सुरळीत, इतर बाजारपेठाही टप्प्याटप्प्याने सुरू करणार : आ.संग्राम जगताप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी नगर शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या होलसेल बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बाजारपेठा सुरू झाले आहेत.कोरोना संसर्ग विषाणूचे सावट संपूर्ण जगावर आले आहे. नगर शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी गेल्या दीड वर्षापासून सहकार्याची भूमिका बजावत आहे. नगर शहरातील विविध सामाजिक संस्थांनी पुढे येऊन संकट काळामध्ये मदतीचा हात दिला आहे.तसेच व्यापाऱ्यांनी कोविडच्या दोन्ही लाटामध्ये प्रशासनाला सहकार्याकरून भूमिका बजावली आहे. शासन निर्देशानुसार आपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य केले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न यशस्वी झाल्याने आता नगर शहरातील सर्व बाजारपेठा टप्प्या-टप्प्याने सुरू होतील.गेल्या दोन महिन्यांपासून या बाजरपेठा बंद असल्यामुळे हमाल माथाडी कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता आता या बाजारपेठा सुरू झाल्यामुळे त्यांचा ही रोजगाराचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.आडते बाजार,दाळ मंडई व मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांची दुकाने सुरू झाली आहेत हे सर्व व्यावसायिक शासन निर्देशांचे पालन करत आहेत व यापुढेही ते प्रशासनास सहकार्य करतील असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
शहरातील शासन निर्देशांचे पालन करत शहरातील होलसेल बाजारपेठांचे कामकाज सुरळीत सुरू झाले आहे याची पाहणी आ.संग्राम जगताप यांनी पाहणी करून व्यापाऱ्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या यावेळी मा.नगरसेवक संजय चोपडा, मर्चंट बॅंकेचे संचालक कमलेश भांडरी, असोसिएशन सचिव संतोष बोरा, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा,संजय लोढा,सतिष लोढा तसेच महापालिकेचे दक्षता पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी अहमदनगर शहरातील कापड बाजार,सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक असोसिएशनच्या व्यापाऱ्यांनी आ.संग्राम जगताप यांची भेट घेऊन आमची ही बाजारपेठ लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली यावेळी आ.संग्राम जगताप यांनी शिष्टमंडळाला सांगितले की, टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा खुल्या केल्या जातील असे त्यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन दिले यावेळी मा.नगरसेवक संजय चोपडा,सागर कायगावकर,अभय कोठारी, सचिन चोपडा, मयूर जामगावकर, स्वप्निल डुंगरवाल, निलेश संचेती, सचिन चोपडा,लाभेश मुथा तसेच आधी व्यापारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments