Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

योगाभ्यासाचे महत्त्व जाणून घेत बीड येथे "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा जीवनात दररोज योगाभ्यासाला स्थान देणे गरजेचे -जिल्हाधिकारी रवींद्र जगताप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बीड :- 'आंतरराष्ट्रीय योग' दिनानिमित्त शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,जिल्हा प्रशासन,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि विविध योग संस्थेच्या वतीने योग दिनाचे जिल्हाधिकारी निवासस्थान परीसरात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक, आर राजा, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी, प्रकाश आघाव पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, अरविंद विद्यागर, जिल्हा योग असोसिएशनचे योग गुरु विनायक वझे, विकास गवते यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हाधिकारी रविंद्र जगताप म्हणाले,जगाला भारताने योग दिनाची देणगी दिली आहे. 2016 मध्ये जागतिक स्तरावर योग दिनाची सुरुवात झाली . प्रत्येकाने आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दररोज योग्य अभ्यास करणे गरजेचे आहे त्यामध्ये जर खंड पडला असेल तर आजच्या दिवसापासून तो सुरू करावा आणि नियमित केला जावा असे जिल्हाधिकारी श्री. जगताप यावेळी म्हणाले.
याप्रसंगी उपस्थितांना प्रत्येक आसनाचे महत्त्व समजावून सांगत प्रत्येक प्रकाराचे प्रात्यक्षिक करून योग गुरु यांनी उपस्थितांना प्रातिनिधिक स्वरूपात योगासने करावयास सांगितले यामध्ये प्राणायाम, कपालभाती, शितली या योगासनांचे सद्यस्थितीत असलेले महत्त्व देखील समजावून सांगितले त्याच बरोबर वज्रासन त्यातील विविध प्रकार तसेच दंडासन, भद्रासन आदीं विविध प्रकारचे योगासने करत उपस्थिलतांचा योग अभ्यास केला. योग अभ्यासाचा शेवट प्रार्थना पठनाने झाला. 
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा कोषागार अधिकारी दिलीप झिरपे, तहसीलदार शिरीष वमने, जिल्हाधिकारी कार्यालयातील गिरीश मोहेकर, शिवशंकर मुंडे-पाटील यांनी योगाभ्यास केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यागर यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री सारूक यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती सुप्रिया गाढवे, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे योगेश आवढाळ, रमाकांत डिंगणे, ज्ञानेश्वर धंडारे, सचिन जाधव, किशोर काळे यांनी यांनी परिश्रम घेतले.

संकलन : महादेव गिते 

Post a Comment

0 Comments