Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विळदघाटात अपघात ; पती-पत्नी ठार, मुलगा वाचलाऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमनगर- मनमाड महामार्ग विळद घाटात रविवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास कंटेनर व वॅगन आर या वाहनांमध्ये जोरदाराची धडक झाली, यात वॅगन आर वाहनाचा चक्कचूर झाला. अपघातात वाहनातील पती-पत्नी ही दोघे जागीच ठार झाले असून, या अपघातात पाटील यांचा ९ वर्षाचा मुलगा वाचला आहे. रवींद्र किसन पाटील (वय 45) व मनीषा रवींद्र पाटील (वय 42 दोघही रा. पाचोरा जि. जळगाव) ही दोघे मयत झाले आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर-मनमाड महामार्गावरील रविवारी (दि.१३) दुपारी ३ वाजण्याच्या सुमाराला जळगाव येथून पाटील कुटुंब हे पुण्याकडे जात असताना, समोरून मोठा कंटेनर  येत होता .बहुतेक कंटेनरचा तोल सुटल्यामुळे तो पाटील यांच्या गाडीवर जाऊन आदळला या अपघातामध्ये पाटील कुटुंबीय जागीच ठार झाले. या घटनेची माहिती  विळद येथील ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा रुग्णालयांमध्ये या दोन्ही व्यक्तीला नेल्यानंतर  त्यांना या ठिकाणी मृत घोषित करण्यात आले आहे. या अपघातामध्ये पाटील यांचा नऊ वर्षाचा मुलगा ऋषिकेश हा या अपघातातून वाचला आहे. एमआयडीसीच्या पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांनी व त्यांच्या पथकाने या मुलाला सुखरूप बाहेर काढले ग्रामस्थांची सुद्धा मदत त्यांना या वेळी झाली त्या या अपघातात मुलाच्या  डोक्याला जखम झाली असून त्याला  येथील डॉक्टर विखे पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 
अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक हा फरार झालेला आहे तर त्याचा साथीदार हा या अपघातामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
या अपघाताची माहिती  पाटील कुटुंबीयांना देण्यात आलेली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.

Post a Comment

0 Comments