Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडर वाहतूक : वाहनासह ४ लाखाचा माल जप्त ; कर्जत पोलिसांची धडकेबाज कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत -     दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर वाहतूक करणारे स्विफ्टकारसह ४ लाख २८ हजाराचा मुद्देमाल पकडण्याची धडकेबाज कारवाई कर्जत पोलिसांनी केली आहे. असिफ गफूर शेख ( वय 22), अरबाज हसन शेख ( वय 22 दोघे रा मुसलमान वस्ती, दूरगाव, ता. कर्जत) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की,दि. 13 जून 2021रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, खेड गावचे दिशेने एक स्विफ्ट कार येत आहे. त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर आहे. ती पावडर घरी जाऊन दुधात पाणी, पावडर व इतर साहित्य टाकून दुधात भेसळ करणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने सदरची माहिती त्यांनी पोउपनि भगवान शिरसाठ ,पोलीस हवालदार महादेव गाडे, पोकॉ सुनील खैरे, गणेश भागडे ,महिला होमगार्ड कल्पना घोडके यांना सांगून सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करा असे आदेशीत केल्याने वरील पोलीस स्टाफ तात्काळ पोलीस स्टेशन येथून खाजगी वाहनाने रवाना झाले. खेड गावचे शिवारात एक स्विफ्ट कार  (क्र.एमएच १४ बीके 2772) असलेली आली असताना त्यास पोलिसांनी थांबवून त्यातील इसमाकडे त्यांच्या नावाबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे असिफ गफूर शेख, अरबाज हसन शेख, (दोघे रा मुसलमान वस्ती, दूरगाव, ता. कर्जत) असे असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने गाडीची झडती घेतली असता, गाडीत दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडरच्या 25 किलो वजनाच्या 8 गोण्या व प्रत्येक गोणीची किंमत 3500 रुपये प्रमाणे 28 हजार रु किमतीच्या असलेली दिसल्या. त्यावेळी पोलिसांनी वरील इसम यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही ही पावडर दुधात भेसळ करण्यासाठी आमचे दूरगाव गावी चाललो होतो. त्यावेळी पोलिसांची खात्री झाली की, सदरची पावडर ही दुधात भेसळ करण्यासाठी घेऊन जात होते, असे कळवून त्यांचे घरी सदरबाबत कशी भेसळ केली जाते, याबाबत प्रक्रिया करून दाखविली. पोलिसांनी वरील दोन इसम यांना पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे विरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन अदखलपात्र गुन्हा रजिस्टर न 694/2021 भा द वि कलम 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या   परवानगीने पुढील तपास पोह तुळशीदास सातपुते हे करीत आहेत. दूध पावडर आणि गाडी असा 4 लाख 28 हजार  रु चा माल जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक  मनोज पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक  सौरभकुमार अग्रवाल,  उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, सहायक फौजदार महादेव गाडे, पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते,  पोलीस कॉन्स्टेबल गणेश भागडे, सुनील खैरे यांनी ,महिला होमगार्ड कल्पना घोडके आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments