Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खंडणी उकळणारा फरार आरोपी जेरबंद ; नगर तालुका पोलिसांची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कट रचून शरीसुखाचे आमिष दाखवून खंडणी उकळणारा फरार आरोपी महेश बागले (रा.नालेगाव,अहमदनगर) याला शहाडोंगर येथून अटक करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे. 
आरोपी बागले हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्यात यापूर्वीही एकूण 4 गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप, पोना सोनावणे, मरकड, पोकाॅ बोराडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.Post a Comment

0 Comments