Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीस पदी मंगल भुजबळ यांची निवड

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर - बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे पुणे येथील व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊस येथे ओबीसी आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी आले असता तेथील छोटेखाणी कार्यक्रमात ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाच्या प्रदेश महिला सरचिटणीसपदी मंगल भुजबळ यांना मंत्री विजय वडेट्टीवार व ओबीसी व्हीजेनटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. 
मंगल भुजबळ यांचे सामाजिक कार्यातील योगदान पाहून तसेच त्यांचा संघर्ष पाहून त्यांची प्रदेश महिला सरचिटणीस पदी नियुक्ती केल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चा चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी महाराष्ट्र भर संघटने चे जाळे मजबूत केले असून येणाऱ्या काळात ओबीसी व्हीजेएनटी वरील होणारा अन्याय संघटना कदापि सहन करणार नसून वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून न्याय मिळवू असे बोलताना बहुजन विकास व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले यावेळी महिला प्रदेशअध्यक्ष साधना राठोड आदी सह सर्व प्रदेश पदाधिकारी तसेच अहमदनगर शहरातील माजी महापौर भगवान फुलसुंदर , नगरसेवक बाळासाहेब बोराटे , सुनील भिंगारे , शहर अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ , विलास भुजबळ , पत्रकार राजेश सटाणकर , सुषमा पडोळे , विशाल वालकर , अभिषेक बोराटे, रमेश सानप उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments