Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोमवारपासून संध्याकाळी सहा वाजे पर्यंतच आडते बाजार- दालमंडई मधील दुकाने चालू राहतील -संतोष बोरा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- प्रशासनाच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नांना हातभार लावण्याच्या उद्देशाने आडते बाजार व दालमंडई येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सायंकाळी 6 वाजे पर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अहमदनगर होलसेल पल्सेस, फ्लोवर्स & राईस मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोरा यांनी एका पत्रकान्वये म्हटले आहे.अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठ मधील आडते बाजार, डाळ मंडई, जुनादाणडबरा , तपकीर गल्ली, तापीदासगल्ली, वंजार गल्ली, पिंजार गल्ली, सरदार पटेल रोड वगैरे परिसरातील सर्व व्यापारी बंधूंनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन कोरोना महामारी संपविण्याच्या उद्देशाने व प्रशासनास सहकार्य करण्याच्या हेतूने सोमवार दि. १४ जून २०२१रोजी पासून सर्व दुकाने संध्याकाळी सहा वाजे पर्यंत चालू राहतील व त्या नंतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या स्वतःच्या, माथाडी कामगारांच्या, दुकानातील काम करणाऱ्या माणसांचा,आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वगैरे सर्व लोकांच्या तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा आरोग्याच्या दृष्टीने सदरचा हा निर्णय घेतलेला आहे. याची अहमदनगर शहर व जिल्हातील लहान मोठे दुकानदारांनी नोंद घ्यावी असे आवाहन असोसिएशन चे वतीने केले आहे.
जर कोणी पाच - दहा व्यापारी सदरचा निर्णय पाळणार नाही म्हणून विचलित न होता आपण आपल्या निर्णयावर ठाम राहावे. आपल्या नशिबावर विश्वास ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घेऊन व्यापारी एकतेची एकजूट सर्व व्यपाऱ्यांनी दाखवावी. वास्तविक पाहता मार्केट यार्ड मधील आपल्या बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी सदरचा निर्णय तीन दिवसापासून अंमलात आणलेला आहे. याचीही नोंद व्यापाऱ्यांनी घ्यावी, असेही आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष संतोष बोरा यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

Post a Comment

0 Comments