Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अमृत योजना पूर्णत्वास नेल्याबद्दल सर्वसाधारण सभेत महापौर बाबासाहेब वाकळेसह मनपा प्रशासनाचे नगरसेवकांनी केले अभिनंदन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि.११) महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमहापौर मालनताई ढवण, आयुक्त शंकर गोरे आदिंच्या उपस्थितीत पार पडली.दरम्यान, महापालिका सर्वसाधारण सभेत कोरोनाच्या काळात ज्या कंञाटी कामगारांनी काम केले आहे. ते कौतुकास्पद असून, त्या कंञाटी कामगारांना कायम करावेत. पावसाळ्यात शहरातील नालेसफाई करण्यात आलेल्या ठिकाणीच गाळ टाकला जातो, तो गोळ उचलून न नेल्याने तो गोळा काही दिवसांनी पुन्हा नाल्यात पडतो, याकडे सभागृहातील उपस्थित नगसेवकांनी लक्ष वेधले. तसेच नगरसेवक अनिल शिंदे यांनी नगर शहरात कोरोना पार्श्वभूमीवर किती लसीकरण झाले, याबाबत लेखी मााहिती मागितली.
दरम्यान, शहरासाठी वरदान ठरलेल्या अमृत योजनाचा पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केल्याने महापौर बाबासाहेब वाकळे व मनपा आयुक्ताचे सभागृहात उपस्थित नगसेवकांनी अभिनंदन केले.
यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, अविनाश घुले, मनोज कोतकर, अनिल शिंदे, भैय्या गंधे, गणेश भोसले, कांबळे, प्रकाश भागानगरे, नगरसेविका शेळके यासह अन्य तीन नगरसेवक प्रत्यक्षात उपस्थित होते. उर्वरित नगरसेवकांपैकी माजी महापौर कदम, कुमार वाकळे आदिंसह अन्य नगरसेवक व नगरसेविका यांनी ऑनलाईन सर्वसाधारण सभेत भाग घेतला.Post a Comment

0 Comments