Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिलेवर अत्याचार करणारा 'कोंढवा'चा फरार आरोपी नगरमध्ये अटक ; तोफखाना पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कोंढवा पोलिस ठाणे हद्दीत महिलेवर अनैसर्गिक अत्याचार करून फरार असणाऱ्या आरोपीस गुरुवार (दि.१०) अहमदनगर येथे तोफखाना पोलिसांनी पकडला. आदित्य शंकर तवपुते (वय २९, रा.सर्व्हे नं.६२,बेशी होम्स फेज २ प्लॅट नं.३०१,पुणे) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, कोंढवा पोलिस ठाण्यात गु.रं.नं.३८३/२०२१ भादंविक ३७७,४९८(अ),३२३,५०४,५०६ या दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी आदित्य तवपुते याची गुप्त बातमीदारामार्फत तोफखाना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध घेतला. दरम्यान तोफखाना पोलिसांनी सापळा लावून अहमदनगर शहरातील वृद्धेश्वरकॉलनी कोहिनूर मंगल कार्यालय जवळ आरोपी तवपुते याला पकडण्यात यश आले.
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि सुनील गायकवाड यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोउपनि सुरज मेढे, पोहेकॉ शकील सय्यद, पोना अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, पोकॉ शैलेश गोमसाळे, सचिन जगताप, मपोकॉ संपदा तांबे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments