Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावधान 👉 Appद्वारे २५० कोटींची फसवणूक

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 

देहराडूनकोरोना व लॉकडाऊन परिस्थिती यामुळे  अनेक जण बेरोजगार झाले आहेत. तसेच काही जणांचा पगार कापला जात आहे. अशाच आपण सोशल मीडियावर पैसे दुप्पट करण्याच्या जाहीराला बळी पडतो आणि मग आपण पैसे दुप्पट होण्यासाठी तो App डाऊनलोड करतो. मग त्यावर अंधळा विश्वास ठेवून त्यामध्ये पैसे गुंतवतो आणि तेच महागात पडते. अशीच घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. उत्तराखंड पोलिसांनी हा मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. नोएडाच्या एका आरोपीने २५० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही फसवणूक ४ महिन्यांच्या आत केली आहे.प्रकरण काय आहे 📲

चीनच्या स्टार्टअप योजनेंतर्गत बनविलेल्या अ‍ॅपद्वारे फसवणूक केली गेली. देशातील जवळपास ५० लाख लोकांनी हा App डाऊनलोड केला आहे. या Appच्या माध्यमातून लोकांनी १५ दिवसांत पैसे दुप्पट होण्याचे आमिष दाखवले होते. आरोपीने पहिल्यांदा लोकांना पैसे दुप्पट करण्यासाठी पॉवर बँक Appला डाऊनलोड करण्यासाठी सांगितले आणि लोकांनी त्यामध्ये पैसे गुंतवले. जेव्हा एका हरिद्वारच्या रहिवाशाने पोलिसांना सांगितले की, एका पावर बँक Appद्वारे पैसे दुप्पट करण्यासाठी दोनदा ९३ हजार आणि ७२ हजार जमा केले होते. हे १५ दिवसात डबल होईल, असे सांगितले होते. परंतु असे झाले नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आणि आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून झाडाझडती सुरू केली आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले की, वेगवेगळ्या खात्यावरून पैसे ट्रान्सपर झाले होते. २५० कोटींची फसवणूक झाली होती. उत्तराखंड एसटीएफचे एसएसपी अजय सिंह म्हणाले की, पोलिसांच्या तपासात एक मोठी बाब समोर आली की, फसवणूक करणारा परदेशी गुंतवणूकद्वारे भारतीय व्यावसायिकांना कमीशनचे आमिष दाखवून एका Appच्या माध्यमातून लोकांना कर्ज देण्याविषयी बोलत असे. पण त्यानंतर यात बदल करून लोकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पैसे भरण्यास सुरुवात झाली.

Post a Comment

0 Comments