Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

63 ब्रेकथ्रू इन्फेक्टेड लोकांवर संशोधन ; डोस घेणाऱ्या 60% लोकांमध्ये आढळला डेल्टा व्हेरिएंट

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कोरोनाची लस घेतलेले लोकही संक्रमित होत असल्याच्या वृत्तादरम्यान दिल्ली AIIMS ने एक संशोधन केले आहे. संशोधनात म्हटले आहे की, लस घेतलेल्या लोकांमध्ये संक्रमणाचे जास्तीत जास्त प्रकरणे कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट (B.1.617.2) आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन व्हॅक्सीनची सिंगल किंवा डबल डोस घेतलेल्या लोकांनाही संक्रमित करत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जास्तीत जास्त लोकांमध्ये केवळ तीव्र तापेसारखी लक्षणे दिसत आहेत. कोणालाही गंभीर आजाराचा सामना करावा लागत नाही. AIIMS ने संशोधनात 63 लोकांना सामिल केले, ज्यांना व्हॅक्सीन घेतल्यानंतर संक्रमण झाले होते. यामध्ये 36 लोक असे होते, ज्यांनी लसीचे दोन्हीही डोस घेतलेले होते आणि 27 लोकांनी केवळ एकच डोस घेतला होता. यामध्ये 10 लोकांना कोरोना व्हॅक्सीन कोवीशील्ड आणि 53 जणांना कोव्हॅक्सिन देण्यात आली होती. AIIMS नुसार संशोधनात सामिल लोकांमध्ये 41 पुरुष आणि 22 महिला होत्या. संशोधनात सिद्ध झाले की, हे सर्वच 63 लोक लस घेतल्यानंतरही संक्रमित झाले होते, मात्र यामध्ये एकाचाही मृत्यू झाला नाही. यामधून जास्तीत जास्त लोकांना 5-7 दिवसांपर्यंत खूप जास्त ताप होता. संशोधनात समोर आले की, लसीचे दोन डोस घेणाऱ्या 63% लोकांना डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित केले, तर एक डोस घेणाऱ्या 77% लोकांमध्ये कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट आढळला. AIIMS च्या इमरजेंसी डिपार्टमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या रुटीन टेस्टिंगसाठी जमा करण्यात आलेल्या नमुन्यांचे संशोधन करण्यात आले होते. यामध्ये खूप जास्त ताप, श्वास घेण्यास अडचण आणि डोकेदुखीची समस्या आढळली होती. मात्र या संशोधनाची आतापर्यंत समिक्षा करण्यात आलेली नाही. संशोधनाच्या रिपोर्टनुसार रिसर्च दरम्यान सर्व रुग्णांमध्ये व्हायरल लोड खूप जास्त होता. मग त्यांनी लसीचा सिंगल डोस घेतलेला असो किंवा दोन्ही डोस. कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सीन दोन्हीही व्हॅक्सीन घेणाऱ्यांमध्ये व्हायरल लोडचा स्तर खूप जास्त प्रमाणात आढळला. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमागे कोरोना व्हेरिएंट B.1.167.2 होता. हे सर्वात पहिले भारतातच आढळले होते. ऑक्टोबर 2020 ला याची माहिती मिळाली. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन (WHO) ने या व्हेरिएंटला 'डेल्टा व्हेरिएंट' असे नाव दिले होते. हा स्ट्रेन आतापर्यंत जगातील जवळपास 53 देशांमध्ये आढळला आहे. WHO ने म्हटले आहे की, डेल्टा व्हेरिएंटवर व्हॅक्सीनचा इफेक्टिव्हनेस, औषधे किती प्रभावी आहेत. यावर काहीच बोलता येऊ शकत नाही. यामुळे रीइन्फेक्शनचा धोका किती आहे, हे देखील माहिती नाही. सुरुवातीच्या परीणामांनुसार, कोविड-19 च्या ट्रीटमेंटमध्ये वापर होणाऱ्या एका मोनोक्लोनल अँटीबॉडीची परीणामकारकता कमी झाली आहे.


Post a Comment

0 Comments