Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेशनचा काळा बाजार उघड ; धान्य व वाहने मिळून 42 लाखाचा मुद्देमाल कोतवाली पोलीसांची कारवाई

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला सुमारे पावणे आठ लाखाचा अवैध धान्य साठा कोतवाली पोलिस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शनिवारी जप्त केला. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर शनिवारी दुपारी छापा टाकून धान्य व सहा वाहने मिळून सुमारे 42 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी मार्केट यार्डमधील 2 दुकाने व केडगाव येथील संबंधित गोडाऊन सील केले आहे. 
रेशनचा काळा बाजार झाला उघड, धान्य व वाहने मिळून 42 लाखाचा मुद्देमाल कोतवाली पोलीसानी केला जप्त, रेशनिंगचा तांदूळ व गहू काळ्या बाजारामध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने केलेला सुमारे पावणे आठ लाखाचा अवैध धान्य साठा कोतवाली पोलिस तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने शनिवारी जप्त केला. शहरातील मार्केट यार्ड तसेच केंडगाव इंडस्ट्रीज इस्टेट अशा दोन ठिकाणी संबंधित व्यापाऱ्याच्या दुकान व गोदामवर शनिवारी दुपारी छापा टाकून धान्य व सहा वाहने मिळून सुमारे 42 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी मार्केट यार्डमधील 2 दुकाने व केडगाव येथील संबंधित गोडाऊन सील केले आहे. 
नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कचरे यांच्यासह पोलीस कर्मचारी गणेश धोत्रे, सुमित गवळी, शाहिद शेख , नितीन शिंदे, प्रमोद लहारे, बंडू भागवत तसेच पुरवठा निरीक्षक निशा पाईकराव, अन्नधान्य निरीक्षक व कार्यालयीन अधीक्षक संतोष लोटके यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल होणार असून पोलिसांनी त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.Post a Comment

0 Comments