Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महाराष्ट्रात सीसीएनएस प्रणालीमध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस विभागाचा 3 रा क्रमांक

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- महाराष्ट्र विभाग पुणे अन्वेषणचे अप्पर पोलीस महासंचालक यांच्या पद्धतीनुसार मार्च 2021 मध्ये महाराष्ट्रातील 48 युनिटमधून गुणांकननुसार अहमदनगर जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळविला. या उत्कृष्ट कामगिरीमुळे अहमदनगर पोलिस विभागाच्या यशात सहभागी पोलिस कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असणारी व जिल्ह्यास तिसऱ्या क्रमांकावर नेणारे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी सीसीटीएनएस विभागाचे सफौ आर.डी. बारवकर, सफौ एस.एस जोशी, पोना गोलवड, मपोना आर.व्ही. जाधव, मपोकॉ एस.एस काळे, के.पी.ठुबे, एस.ए. भागवत, टी.एल दराडे आदींनी उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्वांना मासिक गुन्हे परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सर्व उपविभागीय कार्यालयातील सीसीटीएनएस एडमिन सर्व पोलीस ठाणे सी सी टी एन एस अॅडमिन व विप्रो इंजिनीयर अंबादास शिंगे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. यामुळेच महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्याने तिसरा क्रमांक मिळवला असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांनी यावेळी दिली.
दि. 15 सप्टेंबर 2015 पासून महाराष्ट्रात सीसीटीएनएस प्रणाली सुरू झाले आहे. यामध्ये सर्व पोलीस ठाणे स्तरावरील संपूर्ण कामकाज सदर प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रणालीमध्ये १ ते २१ फॉर्मची विभागणी केलेली आहे. त्यांना सीईएस मंथलीमध्ये गुण देण्याची पद्धत आहे. सीईएस मंथली, सक्सेस स्टोरी, सिटीझन सर्विस या सर्वांचा महाराष्ट्र पोलीस विभागातून गुणांकन करण्यात येत असते, असे श्री पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments