Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुलाचे अपहरण करणा-या आरोपीस 12 तासात अटक ; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- औरंगाबाद येथून 6 वर्षाच्या मुलाचे अपहरण करणा-या आरोपीला 12 तासात श्रीगोंदा पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.9 जून रोजी औरंगाबाद येथील बजाज नगरमध्ये राहणारे परशुराम नवनाथ रासकर (वय 36) यांचे नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोनि रामराव ढिकले यांना माहीती दिली की, परशुराम रासकर यांचा सहा वर्षाचा मुलगा अभिनव यास सागर आळेकर (रा. श्रीगोंदा) याने परशुराम रासकर याची पत्नी हीचेसोबत प्रेमसंबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवून नेईल, असे म्हणून अभिनव यास त्याचे कडील स्विफ्ट डिझायर (एमएच.42 ए.एच.9655) मध्ये किडनॅप करुन श्रीगोंद्याकडे येत आहे. थोड्याच वेळापूर्वी अहमदनगर कायनेटिक चौकातून दौंडरोडने गेला आहे, अशी माहीती दिली. या माहितीवरून पोनि रामराव ढिकले यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना नगर दौंड रोडवर पारगावफाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश देवून तात्काळ रवाना केले. नाकाबंदी दरम्यान सायंकाळी 6 वा. चे. सुमारास मिळालेल्या माहीती मधील स्विफूट डीझायर गाडी (एमएच.42 ए.एच.9655) ही अहमदनगर कडंन दौडकडे जाताना दिसल्याने ती थांबवून त्यातून आरोपी सागर गोरख आळेकर (वय 27 वर्षे,रा.आळेकरमळा, श्रीगोंदा ता. श्रीगोंदा) यास त्याने पळवून आणलेल्या 6 वर्षांच्या अभिनव रासकरसह ताब्यात घेतले. मुलास त्याचे आईवडीलांच्या ताब्यात दिले. आरोपीस पुढील कारवाईसाठी फिर्यादी परशुराम रासकर यांचे फिर्यादीवरुन एमआयडीसी वाळुंज, औरंगाबाद शहर पोस्टे गु.रजि.नं. 651/2021 भा.द.वि.क.363 प्रमाणे दाखल गुन्ह्यात एमआयडीसी वाळुंज, औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील,  अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोनि रामराव ढिकले, सपोनि दिलीप तेजनकर, चासफौ रमेश जाधव, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोका प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, पोकों गोकुळ इंगवले आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Post a Comment

0 Comments