Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कॉग्रेस व कम्युनिष्ट मुक्त भारतच्या दिशेने भाजपा चे दमदार पाऊल - प्रा.भानुदास बेरड

 


ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
📩बंगाल च्या निवडणुकीचा अन्वयार्थ📩
-----------------------
👉कॉग्रेस व कम्युनिष्ट मुक्त भारतच्या दिशेने भाजपा चे दमदार पाऊल 
👇बंगालच्या निवडणुकीचा निष्कर्ष
----------------------
👉कांग्रेस
1952 ते 1967 असा सलग 15 वर्ष बंगालवर काॅग्रेसचा अंमल होता. नेहरूंचा हा काळ. त्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात एक टर्म (1972-77) काॅग्रेसला मिळाली. एवढी वीस वर्ष सोडली तर नंतर बंगाल काॅग्रेसला कधीच जिंकता आला नाही. सिद्धार्थ शंकर राय हे शेवटचे मुख्यमंत्री (1972-77) त्यानंतर गेली तब्बल 44 वर्ष काॅग्रेसला या राज्यात कधीही तिहेरी आकडा गाठता आला नाही. काॅग्रेस 50 च्या आतच राहिली, अपवाद फक्त 1996 च्या 80 जागांचा. आणिबाणीनंतर बंगालनं काॅग्रेसला कायमचं सोडून दिलं. एकदाही सत्ता दिली नाही. काॅग्रेसचं 1977 आणि त्यानंतरचं संख्याबळ राहिलं 1977 (20), 1982 (49), 1987 (40), 1991 (43), 1996 (82), 2001 (26), 2006 (26), 2011 (21), 2016(44) आणि 2021 म्हणजे आत्ताच्या निवडणूकीत 00.


👉कम्युनिष्ट
त्यानंतर म्हणजे 1977 नंतर जमाना सुरू झाला ज्योतीबाबूंचा. कम्युनिस्टांना तब्बल 34 वर्ष एक हाती सत्ता चालवली. 2011 साली ममतांनी डाव्यांची सत्ता संपवली. त्यानंतर डाव्यांना 2011 साली 40 आणि 2016 साली 26 जागा मिळाल्या. आणि 2021 म्हणजे आत्ताच्या निवडणूकीत 00.

👉भाजपा
भाजप बंगालच्या क्षितीजावर दूर दूर पर्यंत कधीच कुठेच नव्हता. सगळ्या जागावंर निवडणूक लढवण्यासाठी पक्षाला सक्षम ऊमेद्वार मिळणे अवघड असायचे। 2011पर्यंत झालेल्या विधान सभा निवडणुकीत पक्षाचे खाते सुद्धा ऊघडले नव्हते। 2016 साली भाजपा ने 3 जागा मिळवून खातं उघडलं. आणि आज ते 78 जागा घेत आहेत. कायम सेक्युलर राहिलेला बंगाल बदलत असल्याचे चित्र आहे. अर्थात भाजपा व संघ परिवार यांनी प्रचण्ड मेहनत घेतली आहे। व हिंदूत्वाचे ग्राऊंड तयार झाले आहे असे म्हणावे लागेल. 

👉तृणमुल कांग्रेस
ममतांची तृणमूल काॅग्रेस 2001 पासून बंगालच्या क्षितीजावर आहे.दोन टर्म त्यांनी खूप खस्ता खाल्ल्या. 2001 साली 60 आणि 2006 साली 30. मात्र नंतर 2011 मध्ये 184, 2016 मध्ये 211 आणि आत्ता 2026 मध्ये ते 212 जागा मिळवत आहेत. तीन निवडणूकांमधलं सातत्य बघाता तृणमुल ने मतदारसंघ व्यवस्थित बांधलेत ।
आज बंगाल मध्ये कांग्रेस व कम्युनिष्ट यांना 00 जागा मिळाल्या आहेत, आणी भविष्यात या मध्ये काही बदल होईल असे बंगाल चा राजकीय इतिहास पाहता वाटत नाही, याचाच अर्थ कांग्रेस व कम्युनिष्ट मुक्त भारत च्या दृष्टीने भाजपा चे हे दमदार पाऊल म्हणावे लागेल। 
-- प्रा भानुदास बेरड
(राज्यशास्र या विषयाचा अभ्यासक म्हणून मांडलेले विचार )

Post a Comment

0 Comments