Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विधानसभा स्वबळावर लढविणार : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबई इंटक बैठकीत घोषणा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई - काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा आहे. आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षाची शक्तिस्थळे मजबूत करण्यासाठी इंटकला मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या 
झूम बैठकीत मार्गदर्शन म्हटले.
पुढे पटोले म्हणाले, कामगार कायदे मोडीत काढीत मालकधार्जिणे कायदे बनवून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकार करत असून केंद्राचे कामगारविरोधी कायदे महाराष्ट्र राज्यात लागू होऊ देणार नाही. तसेच कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य काळापासून इंटकच्या सूचनेवरून अनेक कामगार हिताचे कायदे बनवले आहेत. सध्या केंद्र सरकार मात्र शेतकरी, कामगारांच्या विरोधात कायदे करत आहे. याविरोधात काँग्रेस लढा देण्याचे काम करत असून काँग्रेस हा पक्ष नसून विचारधारा असल्याचे पटोले म्हणाले.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस संघटनेचा ७४ वा वर्धापन दिन पार पडला. त्यानिमित्त झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या समस्या, कामगारांची होणारी हालअपेष्टा, सरकारचे धोरण, काँग्रेस पक्षाकडून इंटकला मिळणारा प्रतिसाद तसेच शासनाच्या विविध मंडळ, महामंडळांवर इंटकला प्रतिनिधित्व मिळावे यावर चर्चा झाली. या वेळी इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी काँग्रेस हितासाठी इंटकला महत्त्व देण्याचे व विविध क्षेत्रांतील कामगारांचे प्रश्न सोडवण्याची मागणी या वेळी त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments