Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेशन दुकानात चालू मे महिन्यात गहू, तांदूळ व डाळ मोफत मिळणार : जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी

 


👉जिल्ह्यातील शिधापञिका संख्या याप्रमाणे-अंत्योदय अन्न योजना (8,7477), प्राधान्य कुटुंब लाभार्थीं (591892) आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना-3 (679369)
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊन काळातील चालू मे महिन्यात रेशन दुकानावर गहू, तांदूळ, डाळ मोफत मिळणार आहे. लाभार्थ्यांना मोफत धान्य न मिळाल्याच्या लेखी तक्रार आल्यास चौकशी करून संबंधित रेशन दुकान चालकावर कारवाई केली जाईल, अशी माहिती अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील रेशनकार्डधारकांसाठी मोफत मे महिन्यासाठी अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थीं आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना-3 या योजनेच्या लाभार्थ्यासाठी गहू 19134.499 मेट्रीक टन व तांदूळ 12172.886 मेट्रीक टन जिल्ह्यातील रेशन दुकानातून मोफत वितारणासाठी पाठविण्यात आला आहे.
अहमदनगर चालू महिन्यात गहू तांदूळ डाळ रेशन दुकानांमध्ये मोफत देण्यात येत आहे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी व प्रधानमंत्री प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना येथील लाभार्थ्यांसाठी रेशन शासनाच्या आदेशानुसार मोफत देण्यात येत असे जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी म्हटले.
नगर जिल्ह्यात साखर वगळतात गहू, तांदूळ, डाळ मोफत वितरित केली जात आहे. अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थासाठी गहू 2186.925 मेट्रीक टन, तांदूळ 874.770 मेट्रीक टन.
प्राधान्य कुटुंब लाभार्थींसाठी गहू 7830.774 मेट्रीक टन, तांदूळ 5220.516 मेट्रीक टन आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना-3 च्या लाभार्थासाठी गहू 9116.800 मेट्रीक टन, तांदूळ 6077.600 इतका नगर जिल्ह्यातील रेशन दुकानात मे महिन्याचे मोफत धान्य लाभार्थासाठी पोहच केले जात आहे.
अंत्योदय अन्न योजनेतील चार लाख 28 हजार 727 लाभार्थ्या असून, प्रति शिधापत्रिकाधारक मोफत गहू 25 किलो, तांदूळ 10 किलो व साखर एक किलो 20 रुपये किलो प्रमाणे देण्यात येणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील 26 लाख 10 हजार 258 लाभार्थी संख्या असून, यांच्यासाठी प्रत्येकी रेशनधारकास मोफत गहू प्रती व्यक्ती 3 किलो, तांदूळ 2 किलो.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना 3 या योजनेत 30 लाख 38 हजार 985 लाभार्थी संख्या असून मोफत गहू प्रती व्यक्ती 3 किलो, तांदूळ 2 किलो व डाळ ज्या दुकानात जेवढी जितक्या महिन्यासाठी पुरेल ती प्रथम प्राधान्याने येणा-या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याकरिता डाळ संपेपर्यंत असणार असल्याचेही माळी सांगितले.

Post a Comment

0 Comments