Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठा समाजास न्याय न मिळाल्यास बीडच्या आंदोलनात सहभागी होणार :- नवनाथराव इसरवाडे

 


शिवसंग्राम पक्षाने दिले शेवगाव तहसीलदार यांना लेखी निवेदन
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव - मराठा समाजास न्याय न मिळाल्यास दि. ५ जून २०२१ रोजी होणाऱ्या बीड येथील आंदोलनात सहभागी होणार असल्याचे लेखी निवेदन शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना दिले आहे.

शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांना शिवसंग्राम पक्षाने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला अनेक वर्षाच्या संघर्षाच्या नंतर मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी रद्द केले. मराठा आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान शासनाने व मराठा समाजाचे विषय हाताळणारे मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही, व्यवस्थीत नियोजन केले नाही. सर्वाना विश्वासात घेतले नाही, म्हणून एकूणच सरकार व श्री.चव्हाण यांनी मराठा आरक्षण गांभीर्याने घेतले नाही म्हणूनच मराठा आरक्षण रद्द झाले आहे, मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर असंतोष निर्माण झालेला आहे. समाजाचे आणि पुढील पिढीचे भविष्य यामुळे उधवस्त झाले आहे. याचे सोयरसुतक श्री चव्हाण व सरकारला अजिबात नाही. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर शासनाने व आपण मुख्यमंत्री या नात्याने मराठा समाजाला पुढील प्रमाणे निर्णय घेऊन न्याय दयावा यामध्ये मराठा समाजाला त्वरीत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकाचे केंद्र शासनाचे १० % आरक्षण देण्यासाठी शासनाने त्वरीत G.R. काढावा, मराठा समाजाला ओबीसी (OBC) समाज बांधवा प्रमाणे आरक्षण वगळता इतर सर्व सोई सवलती देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने आधिक तरतुदीसह त्वरीत घ्यावा, मराठा समाजाच्या मुला-मुलीची शैक्षणाक फिस ची १०० % प्रतिपुर्ती शासनाने करावी. यामध्ये मेडिकल, इंजिनिअर, आयटीआय, टेक्नीकल शिक्षण इत्यादी, शिष्यवृत्ती देण्यात यावी, शैक्षणिक प्रवेश कसा देणार ते स्पष्ट करावे, पर्शिक्षण,परदेशी शिक्षण, मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलीनी ESBC- २०१४ व SEBC २०१८/१९ आणि इतर विभागाच्या पद भरतीची सर्व पर्क्रिया ज्यांनी पूर्ण केल्या आहेत त्या सर्वाना (५-६ हजार) न्यालयाचा बु न करता त्याचे कारण न सांगता त्वरित मंत्रिमंडळाने एकत्रितपणे निर्णय घेऊन नियुक्त्या देण्यात याव्यात, सारथी संस्था पूर्ण कार्याने कार्यान्वित करावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करून किमान रुपये ५० हजार थेट कर्ज देण्याचे अधिकार द्यावेत, मराठा समाजाच्या ज्या मुला-मुलींना उद्योग व व्यवसाय करायचा आहे त्यांना भाग भांडवल शासनाने द्यावे, मराठा समाजाला परिपूर्ण पणाने आरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीररीत्या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार योग्य त्या प्रकारे प्रस्ताव तयार करून राज्यपाल मार्फत राष्ट्रपती कडे पाठवण्यात यावा, ५ मे २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पूर्णविचार याचिका दाखल करावी, राज्य मागासवर्गीय आयोगाची त्वरित स्थापना करावी, कोपर्डी व तांबडीच्या नराधमांना फाशीची शिक्षा लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करावेत, मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या कुटंबियाना आर्थिक मदत व नोकरी द्यावी, मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे माफ करावीत. वरील प्रमाणे शासनाने त्वरीत निर्णय घ्यावेत व मराठ समाजाला दिलासा द्यावा, या करीता आम्ही आमच्या वतीने '' इशारा निवेदन '' देत आहोत. लवकर निर्णय नाही घेतला तर समाजाला लोकशाही मार्गाने आंदोलन करण्या शिवाय पर्याय राहणार नाही. सदरील आंदोलनाची सुरुवात आम्ही बीड पासून दि. ५ जून २०२१ रोजी आमच्या अधिकारासाठी मोर्चा करणार आहोत. कृपया त्वरित निर्णय घ्यावेत. अशा मागणीचे तसेच या आशयाचे लेखी निवेदन शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांनी तहसीलदार यांना दिले आहे. यावेळी शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष नवनाथराव इसरवाडे, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीपराव बामदळे, स्वाभिमानी मराठाचे जिल्हा संपर्क प्रमुख सतीशराव पवार यांच्यासह आदी उपस्थित होते.

मराठा समाजाने पक्षाची जोडे बाजूला ठेवून मराठा आरक्षण मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन केंद्र सरकार व राज्य सरकार यांना भाग पाडण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. संपूर्ण मराठा समाज हा प्रत्येक पक्षामध्ये विभागला गेल्यामुळे आरक्षण मिळण्यास अडचण निर्माण होत आहे तरी सर्व मराठा समाजाला विनंती करीत आहे की, आपण सर्वांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकत्रित आल्यास लढा देता येईल.
सदिपराव बामदळे
तालुका अध्यक्ष प्रहार संघटना, शेवगाव

Post a Comment

0 Comments