Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव येथे अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी भेट देवून केली पाहणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात पाहणी करुन आढावा घेण्यासाठी नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी रविवारी शेवगाव येथे भेट दिली.
यावेळी तालुक्यातील अधिक संसर्ग असलेल्या ठाकुर निमगाव येथे भेट देवून त्यांनी शहरातली कोवीड सेंटर व खाजगी रुग्णालयांची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार अर्चना भाकड - पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, तालुका आरोग्य अधिकारी डाँ. सलमा हिराणी, ग्रामिण रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक रामेश्वर काटे, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब कासार आदी उपस्थित होते. 
शेवगाव शहरातील अंबिका काँलनी प्रतिबंधीत क्षेत्रासह मारुतराव घुले, आंबेडकर भवन, ग्रामिण रुग्णालय, त्रिमुर्ती स्कुल, अथर्व हाँस्पीटल कोवीड सेंटरची पाहणी केली. तसेच खाजगी रुग्णालयातील सुविधा, औषधोपचार, आवश्यक सामुग्री, रुग्णांकडून आकारलेले बील, फायर आँडीट, आक्सीजन उपलब्धता या संदर्भात आढावा घेतला. ठाकुर निमगाव येथे भेट देवून विलगीकरण कक्ष, प्रतिबंधीत क्षेत्र, रुग्णांच्या चाचण्या, प्रशासनाने केलेल्या उपाय योजना यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी गावस्तरावर चाचण्यांसाठी तपासणी कीट उपलब्धतेबरोबरच लसीकरणही येथेच राबवावे असे निर्देश दिले. यावेळी सरपंच सुनिता संभाजी कातकडे, ग्रामसेवक प्रदीप लबडे यांनी गावातील संसर्गाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments