Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुद्ध जयंतीनिमित्त होमिओपॅथीच्या आर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे किट वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाटप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - वैशाख पौर्णिमा निमित्ताने कोपरगाव येथील लुम्बिनी उपोवन बुद्धविहार (मोठा पूल) याठिकाणी बुद्ध जयंतीनिमित्त कोरोना रोगावर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होमिओपॅथीच्या आर्सनिक अल्बम ३० गोळ्यांचे ( किट)वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भन्तेजी काशप व सर्व उपस्थितांना वाटप करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शरद खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल बनसोडे, शहर उपध्यक्ष संजय कोपरे, आकाश दुशिग, निलेश खरात, शैलेश खरात, सिद्देश खरात, दिपक शिनगारे, आदिसह वंचितचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संकलन : राजेंद्र दुनबळे, शिर्डी Post a Comment

0 Comments