Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्यात यावेत : जिपच्या अध्यक्षा सौ राजश्री घुले पा.

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव- बोधेगाव परिसरातील ग्रामीण भागातील सामन्य गोरगरीबांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्याचा सर्वांना फायदा होणार असून जनतेनी कुटूंबासह शेजाऱ्यांची आरोग्याची काळजी घेऊन साथ रोखण्यासाठी व कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्यात यावा, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ राजश्री घुले पाटील यांनी व्यक्त केले.
बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यात यावे अशी परिसरातून जोरदार मागणी होती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना घुले यांनी तातडीने या ज्वलंत प्रश्नात लक्ष घालून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले पालकमंत्री हसन मुश्रीप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करून बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात 30 कॉटचे कोविड सेंटरला मंजुरी करून घेतले या कोविड सेंटरचे उदघाटन ना राजश्री चंद्रशेखर घुले पाटील यांच्या शुभहस्ते पंचायत समितीचे सभापती डॉ क्षितिज घुले पाटील, शेवंगावच्या तहसिलदार अर्चना पागीरे, गटविकास अधिकारी डोके, शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ रामेश्वर काटे, डॉ दीपक परदेशी, डॉ भिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सलमा हिराणी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, 
बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुरे,प्रल्हाद शिंदे, राजेंद्र ढमढेरे, युवा नेते प्रशांत देशमुख, माजी सरपंच रामजी अंधारे, भाऊराव भोंगळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एकनाथ कासाळ, बाबासाहेब देशमुख, सचिन घोरतळे, ग्रामविकास अधिकारी काटे, तलाठी अमर शेंडे, आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते आभार रामनाथ राजपुरे यांनी मानले 
👉शेवगावच्या जनतेला प्राधान्य द्या 
शेवगाव ग्रामीण रुग्णालयात १८ते ४४ वयोगटातील कोविड लसीकरण नुकतेच सुरू झाले असून ऑनलाइन नोंदणी सुरू असल्याने 
ग्रामीण जनतेला मोबाईल हाताळता येत नाही नोंदणी होत नसल्याने त्याचा लाभ तालुक्या बाहेरील इतर नागरिकांना फायदा मिळत आहे स्थानिक जनता वंचित राहत असल्याने बाहेरील नोंदणी रद्द करून तालुक्यातील नागरिकांना प्रथम प्राधान्याने जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी ऑनलाइन नोंदणीत नियम शिथिल करून स्थानिकांना लस द्यावी अशी जोरदार मागणी सभापती डॉ क्षितिज घुले यांनी तहसीलदार अर्चना पागीरे व आरोग्य अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे.
संकलन :बाळासाहेब खेडकर 


Post a Comment

0 Comments