Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यातील 'त्या' पोलिसांच्या लवकरच बदल्या होणार !


जिल्ह्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या 'त्या' पोलिसांच्या बदल्या ! ; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मागवली माहिती 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये अथवा पोलिस मुख्यालय, स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षापासून कालावधी संपुष्टात येऊनही त्याच ठिकाणी कार्यरत असणाऱ्यांची माहिती मागविण्यात आली असून, त्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील येत्या काही दिवसात करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रशासकीय बदल्यांमध्ये नगर जिल्ह्यातील 180 पोलिस कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. यात पोलीस मुख्यालय, स्थानिक गुन्हे शाखेचे व नगर शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प यासह पाथर्डी, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर शहर, संगमनेर, जामखेड, शनिशिंगणापूर, नगर तालुका यासह अन्य जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसणार 'त्या' सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील करणार आहेत. त्या संबंधित पोलिस ठाणे प्रमुखांकडून अनेक वर्षांपासून एकाच पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या 'त्या' संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी माहिती मागविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वर्षानुवर्ष ऐकाच ठिकाणी चिटकुन बसलेल्या त्या पोलीस कर्मचा-यांची  बदली कधी होणार याबाबत सर्वांनाच मोठा प्रश्न पडला आहे. इतर कर्मचार्यांपेक्षा या कर्मचार्यांचा रुदबा जरा अनोखाच आहे, कारण इतर पोलीस कर्मचार्यांचा बदलीसाठी कालावधी पाच वर्षे आहे. किंवा वाढीव विनंती असेल, तर ऐक वर्षासाठी वाढीव दिले जाते मात्र या कर्मचार्यांन साठी आत्तापर्यतचे साहेब मेहरबान ठरले आहे. तेरी भी चुप मेरीभी चुप, असा प्रकार शांततेत सुरु आहे.
     यातील अनेक कर्मचारी आठ ते दहा वर्षे ऐकाच ठिकाणी ठाण मांडुन बसले आहेत त्यांच्याबाबत बदलीचा निर्णय तातडीने करुण इतर कर्मचार्यांनाही न्याय द्यायला हवा.

Post a Comment

0 Comments