Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वैद्यकीय सेवा देणाऱ्यांवर हल्ले केल्यास कठोर कारवाई : जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील

 


👉वैद्यकीय सेवा देणाऱ्यांवर हल्ले अथवा तोडफोड केल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय पोलीस हेल्पलाईननंबरवर संपर्क करण्याचे आवाहन 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या लोकांवर झालेल्या हल्ल्याची व रुग्णालय तोडफोडीच्या घटनांचा निषेध आहे. यापुढे वैद्यकीय सेवा देणाऱ्यांवर हल्ले झाल्यास व रुग्णालयाची तोडफोड कृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कार्यवाही केली जाईल. तसेच जास्तीत जास्त शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. याकरता पोलिस विभागाने हेल्पलाइन नंबर दिला असल्याचे प्रसिध्दीपत्रकात अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी म्हटले आहे.
नगर जिल्हयामध्ये मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना विषाणुने बाधीत झालेले रुग्ण विविध रुग्णांलयात औषधोपचार घेत आहेत. अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुर्दैवाने काही लोकांना यात प्राण गमवावे लागले. रुग्ण संख्या कमी व्हावी व जास्तीत जास्त रुग्ण बरे व्हावेत, यासाठी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, नर्स व त्यांचा स्टॉफ स्वत:चा जीव धोक्यात घालून अहोराञ कार्यरत आहेत.
मागील काही दिवसात अशी रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांवर हल्ले झाले आहेत. वैद्यकीय सेवा देणारे सर्वजण रुग्ण बरा होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतात. परंतु काही कारणास्तव त्यांना यश येत नाही. अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक किंवा रुग्णांचे जवळचे लोक वैद्यकीय सेवा देणाऱ्यांस जबाबदार धरुन त्यांच्यावर हल्ले करक रुग्णांलयाची तोडफोड करतात. मागील काही दिवसांपासून असे हल्ले व रुग्णालयाची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या घटना योग्य नसून संबंधित हल्लेखोर लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे. सर्वते कायदेशीर पुरावे जमा करुन अशा हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, यासाठी पोलीस प्रशासन हे प्रयत्नशिल असेल.
वैदयकिय क्षेत्रात सेवा देणाऱ्यांनी अशा घटना घडल्यास अथवा परिस्थिती निर्माण होत असल्यास जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय पोलीस हेल्पलाईन 0241-2416132,2416138 व नजिकच्या पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन श्री पाटील यांनी पञकात केले आहे.

Post a Comment

0 Comments