Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळात शाळेची फी न घेण्याचा निर्णय ; स्वामी विवेकानंद विद्यालय बावी.चा उपक्रम

 

महाराष्ट्र राज्यातील पहिलीच
 एकमेव खाजगी अशी शाळा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव - जोपर्यंत आम्ही विद्यार्थ्याला प्रामाणिकपणे प्रत्यक्ष शिक्षण देऊ शकत नाही तोपर्यंत आम्ही पालकांकडून पैसेही घेणार नाही, असा संकल्प हाती घेतला असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष कुंडलिक निवृत्ती लटपटे यांनी दिली आहे.

स्वामी विवेकानंद विद्यालय बावी येथे नर्सरी पासून इयत्ता १ ली ते इ.८ वी. या एकूण ११ वर्गांसाठी सन-२०२० - २१ व शैक्षणिक वर्षे२०२१-२२ साठी जोपर्यंत प्रत्यक्ष शाळा सुरू होत नाही तोपर्यंत सर्व वर्गांसाठी प्रवेश मोफत राहतील. जेंव्हा प्रत्यक्षात शाळा सुरू होतील तिथून पुढे च शाळेची फीस घेण्यात निर्णय घेतला आहे 
ज्या दिवशी प्रत्यक्षपणे विद्यार्थी शाळेत येतील तिथून पुढेच पुढील फी २०२१- २२ या शैक्षणिक वर्षाची शाळेची नियमित विद्यार्थी शाळेत आल्यापासून पुढीलच फीस घेतली जाईल,मागील फी घेतली जाणार नाही, तसेच मागील वर्षी ची म्हणजेच सन 2020 -21 ची एक रुपयाही फी न घेण्याचा पवित्रा घेतला असून मागील वर्षी काही ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने शिक्षण देऊन सुध्दा पालकांना शाळेने एकही रुपया फी न घेण्याच्या निर्णयाने पालकांना दिलासा मिळाला आहे. 
वरील सर्व नियमावली फक्त सन 2020-21 व सन 2021 - 22 या शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत च राहील, असेही शाळा व्यवस्थापनाने निश्चित केले आहे.
खरं तर कोरोना सारख्या भयानक साथीने जगभरात हाहाकार उडाला असून सर्वच क्षेत्राला त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला असून शैक्षणिक क्षेत्रात मात्र विद्यार्थ्यांपासून शाळा, संस्था, शिक्षक या सर्वांचे च मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यातच काही शाळांनी ऑनलाईन च्या नावाखाली पालकांकडून काही प्रमाणात तर काही शाळांनी पूर्णपणे फिस घेऊन पालकांच्या वरती कोरोना काळात आर्थिक संकटात सुध्दा वसुली केली व करत आहेत.
मात्र स्वामी विवेकानंद विद्यालय बावी ता. आष्टी, जि.बीड येथील राज्यातील पहिलीच एकमेव अशी शाळा अपवाद ठरली आहे. ज्यांनी सर्वात प्रथम कोरोना काळात फी न घेण्याचा निर्णय घेऊन पालक व विद्यार्थ्यांना दिलासा दिला असून गेल्या दीड वर्षापासून पालकांकडून एकही रुपया फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या शाळेमध्ये नर्सरी, पासून १ ली ते ८ वी पर्यंत चे एकूण ११ वर्ग असून २५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या सर्वांना मोफत शिक्षण देणारी शाळा अव्वल ठरतेय.खरं तर या शाळेचे पार्श्वभूमी ही अतिशय संघर्षमय असून संस्थेचे अध्यक्ष यांचे आई वडील ऊसतोड कामगार असून ग्रामीण भागातील शेतकरी, ऊसतोड मजूर व ग्रामीण भागात ड्रायव्हर म्हणून बरेच बाहेरगावी जाणाऱ्या पालकांच्या मुलांना या शाळेत दर्जेदार शिक्षण दिले असून परिसरातील १० गावामधील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात.तसेच या शाळेत दरवर्षी १० ते १२ अनाथ मुलांना या शाळेत मोफत शिक्षण ही दिले जाते.
ग्रामीण भागात निसर्गाच्या सान्निध्यात ४०० विविध झाडांच्या छायेत एका माळरानावर ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कार देण्याच्या हेतूने सर्व सोयी सुविधांयुक्त व निसर्गरम्य ठिकाणी शैक्षणिक वातावरणाची निर्मिती करून प्रभावी कार्य करते, शैक्षणिक नावीन्यपूर्ण विविध उपक्रम राबवणारी ही परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारी आदर्शवत शाळा ठरत आहे हे मात्र विशेष. त्यातच फी माफीचा शाळेने घेतलेला निर्णय हा सर्वोत्कृष्ट ठरत असून सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत व कौतुक होत आहे.

संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments