Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तडीपार सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टासह तलवार जप्त ; श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
श्रीरामपूर - तडीपार सराईत तीन गुन्हेगारांना अटक  करून त्याच्याकडून   गावठी कट्टासह तलवार जप्त करण्याची मोठी कारवाई श्रीरामपूर शहर पोलीसांनी कामगिरी केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, तडीपार आरोपी आनंदा यशवंत काळे हा होंडा डिओ मोटार सायकलवर त्याचे दोन साथीदारासह पिस्टल बाळगुन एमआयडीसी परिसरात फिरत आहे. या माहितीनुसार पोलीसांनी आनंदा यशवंत काळे (वय ३९ रा. सुतगिरणी परिसर श्रीरामपूर) व त्याचा साथीदार सनी विजय भोसले (वय २३ रा. दत्तनगर श्रीरामपूर) यांना होंडा डिओ मोटार सायकलवर एमआयडीसी ते रेणूकानगरकडे जाणारे रोडवर जातांना पकडले. त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरुन पळून गेला. पळून गेलेल्या साथीदाराचे अमित प्रभाकर कुमावत (वय ३० रा.गौरव रिसिडेन्सी प्लॅट नंबर १ बोरावकेनगर वार्ड नं. ७ श्रीरामपूर) असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीतांचे होंडा डिओ गाडी (नं. एमएच. १६. सी. एल. ०२०५) चे डिक्की मध्ये असलेले एक गावठी कट्टा व त्याचे मॅग्जिनमध्ये एक जिवंत काडतुस असे एकूण ६५ हजार रुपयचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केले आहे. पोकाॅ सुनिल दिघे यांनी दिलेल्या खबरवरुन तिन्ही आरोपीतांन विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,७/२५, भादवि. कलम ३४, म.पो. का. क १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
तडीपार आरोपी आनंदा यशवंत काळे याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला घरफोडी, दरोड्याची तयारी, चोरी, जबरी चोरी वगैरे १२ गुन्हे दाखल आहे. तसेच सनी विजय भोसले (वय २३ रा. दत्तनगर श्रीरामपूर) यांचे विरुध्द श्रीरामपूर शहर पोस्टेला जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
तसेच आरोपी बल्ली उर्फ बलराम रामचित यादव (वय २३ रा. सरस्वती कॉलनी वार्ड नं. ७ श्रीरामपूर) याने दि. २० नोव्हेंबर २०१८ रोजी फिर्यादी विनित गगन नारंग (रा. वार्ड नं. १ श्रीरामपूर) याची एक सुझुकी एक्सेस स्कुटर व एक मोबाईल तसेच २ हजार ५०० रु रोख रक्कम जबरीने चोरुन नेले बाबत दि. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यातील सुझुकी एक्सेस स्कुटर किमंत ४० हजार रु प्रमाणे जप्त करण्यात आलेली आहे. तसेच नमूद आरोपी याचेकडून दि.४ मे२०२१ रोजी एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस तसेच अॅक्टीवा मोटार सायकल पोलीसांनी जप्त केलेली होती.
तसेच फिर्यादी जाकिर कासम शेख (रा. गुलशनगर वार्ड नं. २ श्रीरामपूर) याची राहाते घरासमोरुन दि.६ मे २०२१ चे रात्री ९ वा.ते दि. ७ मे २०२१ रोजी पहाटे ४ वा. चे दरम्यान हिरो स्प्लेडर प्लस मोटार सायकल चोरीस गेल्या बाबत दि. ८ मे २०२१ रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर मोटार सायकल विधी संघर्षित बालक सुनिल दिलीप जावळकर (रा.धनगरवस्ती वार्ड नं. २ श्रीरामपूर ) याचे कडून दि. ८ मे २०२१ रोजीच त्वरित जप्त करण्यात आलेली आहे. सदर मोटार सायकल खोललेल्या अवस्थेत मोटार सायकलचे स्पेअर पार्ट मिळून आलेले आहेत.
तसेच तडीपार आरोपी योगेश राजेंद्र काळे (वय २७ रा.वडाळा महादेव) हा दि. ९ मे २०२१ रोजी दुपारी १२.३० वा.चे दरम्यान वडाळा महादेव एसटी स्टॅन्डजवळ बेकायदेशिररित्या स्वतःच्या कब्जात एक लोखंडी तलवार बाळगतांना मिळून आल्याने त्याचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ सह म.पो.का.क १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. संजय सानप, सपोनि संभाजी पाटील, पोउपनि समाधान सुरवडे, पोहेकॉ जोसेफ साळवी, पोकॉ सुनिल दिघे, पोहेकॉ आर. ए. खेडकर, पोना बिरप्पा करमल, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ राहुल नरवडे, पोकॉ पंकज गोसावी, पोनाअमोल जाधव, पोना संजय दुधाडे, पोकॉ किरण पवार आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Post a Comment

0 Comments