Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कल्याणरोड परिसरातील लसीकरण केंद्राचा प्रश्न मार्गी ; नगरसेवक सचिन शिंदे पाठपुराव्याला यश

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर लसीकरणा शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही यासाठी लवकरात-लवकर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे ढोस देणे गरजेचे आहे. कल्याण रोड परिसरात मोठी लोकवस्ती आहे,तरी महापालिकेच्या माध्यमातून लसीकरणाचे केंद्र सुरू केले असून याभागतील नागरिकांचे टप्प्याटप्प्याने लसीकरण केले.लसीकरणाचा जास्त कोटा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी केले.

नगरसेवक सचिन शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड परिसरामध्ये लसीकरण केंद्र सुरु यावेळी दिनकर आघव,प्रा.उत्तमराव राजळे,राजेंद्र शिंदे,संजय भापकर,सुरेंद्र बोऱ्हाडे,सुधीर आघव,जय डिडवानीया,सतीश गिते मनोज शिंदे,संजय साकुरे,रवि बागडे,शेखर ऊंडे,अविनाश पांढरे, प्रशांत काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दिनकर आघाव म्हणाले की, कल्याण रोड परिसरामध्ये लसीकरण केंद्र नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना सावेडी उपनगर तसेच माळीवाडा येथील लसीकरण गर्दी केंद्रावर लसीकरणासाठी जावे लागत होते परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण होत होती त्यामुळं कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली होती परंतु या प्रभागातील नगरसेवक सचिन शिंदे यांच्या प्रयत्नातून लसीकरण केंद्राचा प्रश्न आता मार्गी असे म्हणाले.

Post a Comment

0 Comments