Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ ; जिवंत काडतुसेसह सुमारे ४ लाखाचा ऐवज लंपास

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव : शेवगाव पूर्व भागातील शिंगोरी, ठाकूर निमगाव येथे दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून जबर मारहाण केली. सोने चांदीच्या दागिने सह रोख रक्कम असा सुमारे 4 लाखाचा माल व बंदुकीची काडतुसे हस्तगत करून चोरट्याने पलायन केले. या मारहाणीत दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे दरोडेखोरांची मोठी दहशत निर्माण होऊन जनतेत मोठी घबराट निर्माण झाली आहे. 
याबाबत पोलीस पोलीस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की, रविवारी रात्री 3 च्या सुमारास शिंगोरी येथे गावाच्या मध्यभागी राहत असलेले ज्ञानदेव कोंडीबा चेमटे यांच्या राहत्या घराचे दरोडेखोरांनी कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील आठ तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोने व रोख रक्कम २५ हजार रुपये व डबल बार बंदुकीचे ४ जिवंत काडतुसे दरोडेखोरांनी लंपास केली तसेच सुधाकर चेमटे यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणापासून काही अंतरावरील धोंडीराम चेमटे यांच्या घरात प्रयत्न केला त्याच्या खिशात असलेले तीन-चार हजार रुपये लंपास केले तसेच बाळासाहेब मारोती बोडखे यांच्या घराकडे दरोडेखोरांनी प्रयत्न केला तो अयशस्वी झाला आहे.
चेमटे यांना जाग आली असता हा प्रकार लक्षात आला आरडओरड झाल्याने तोपर्यंत चोरट् पसार झाले घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सकाळी घटनास्थळी भेट दिली. 
याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात ज्ञानदेव कोंडीबा चेमटे
यांच्या फिर्यादीनुसार सायंकाळी उशिरा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे तर ठाकूर निमगाव येथे कोरोनाने थैमान घातले असल्याने जनता भयभीत असताना रविवारी जनार्धन भीमराज निजवे यांच्या घरात चोरट्याने प्रवेश करून फिर्यादी जनार्धन व त्यांची पत्नी छाया यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. बळजबरीने त्यांच्या गळ्यातील आठ ग्राम सोन्याचे दागिने व रोख रक्कम एक लाख दहा हजार रुपये असा एकूण १ लाख ३४ हजार रुपये बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याबाबत जनार्धन भीमराज निजवे यांच्या फिर्यादी नुसार शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दोन्ही घटनेत सुमारे ४ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे या घटनेमुळे जनतेत घबराट निर्माण झाली आहे. याबाबत पोलिसांकडून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता देण्यास असमर्थ दर्शविली व घटनेला दुजरा दिला आहे.
शेवगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने कायदा सुव्यवस्था ढासाळल्याने दिवसा ढवळ्या घरफोड्या, जबरी चोऱ्या, वाहनचोरी, दरोडे, रस्तालुट, गोळीबार, वाळूतस्करी, दारू, जुगार मटक्याचे अड्डे, या सारख्या गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने लक्षनिय वाढ होऊन गुन्हा दाखल होऊन एकाही गुन्ह्याचा तपास पोलिसांना लागला जात नाही सामन्य जनता गुन्हेगारांच्या दहशतीखाली सध्या वावरत असून रक्षण करणारे पोलिस यंत्रणेने कायदा वेशीला टांगल्याने ‘’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे बीद वाक्य फक्त कागदोपत्री दिसत आहे. 

👉गुन्हेगारीमुळे शेवगाव तालुक्यात बिहारीराज निर्माण झाल्याचे चित्र आज दिसत आहे पोलिस गुन्हेगाराबरोबर आर्थिक तडजोडीसाठी बैठकात धन्यता मानण्यात मुश्गुल झाले आहेत. पोलीस व अधिकारी मात्र फक्त हप्ते वसुलीच्या कामात गुंतले आहेत. गत आठवड्यात उपभिभागीय कार्यालयातील तीन पोलीस कर्मचारी लाचलुचपत विभागाने कारवाई करून निलंबित केले सदर आरोपी फरार असून त्या घटनेची चौकशी सुरू आहे मात्र त्यांच्या गॉडफादर अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली मात्र तपशील मिळाला नाही. शेवगाव तालुक्यात पोलिसांची डागाळली गेली आहे जिल्हा पोलीस प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी जनतेतून भावना व्यक्त होत आहे.
गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी लक्ष घालून वाढलेली गुन्हेगारी व पोलिसांचे विविध करारनामे रोखण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
👉👉👉👉👉👉
संकलन : बाळासाहेब खेडकर

Post a Comment

0 Comments