Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाळवणी कोविड सेंटरला 'क्रिस्टल हाॅस्पिटल'तर्फे ११ हजारांची मदत

 

👉क्रिस्टलचे संचालक डाॅ. ज्ञानेश्वर दराडे यांनी रुग्णांना 'आरोग्यधारा' वर दिली माहिती 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - पारनेर तालुक्यातील भाळवणी कोविड सेंटरला अहमदनगर क्रिस्टल हॉस्पिटलने भेट दिली. यावेळी 'क्रिस्टल हॉस्पिटल'तर्फे कोविड सेंटरला श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट विश्वस्त तथा क्रिस्टल हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर दराडे व डॉ. जितेंद्र ढवळे पा. यांच्या हस्ते श्री मोहटादेवी प्रतिमा व ११ हजार रुपयांचा चेक आमदार निलेश लंके यांच्याकडे देण्यात आला.


भाळवणी कोविड सेंटर भेटीदरम्यान तेथील रुग्णांशी डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी चर्चा करून मिळत असणाऱ्या उपचाराबाबत माहिती घेतली. तसेच रुग्णांना आरोग्याबाबत काळजी कशी घ्यावी, याबाबत डॉ. दराडे यांनी रुग्णांना माहिती दिली. यावेळी या महामारीच्या काळात मदत दिल्याने विशेषता: 'क्रिस्टल हॉस्पिटल' बरोबरच डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांचे आ. निलेश लंके यांनी आभार मानले. यावेळी क्रिस्टल हॉस्पिटलच्या सौ कांचना पालवे, गणेश फासले, अरविंद वाबळे, कृष्णा आडोळे आदींसह हॉस्पिटल कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments