Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कोरोना संकट काळात मुंगीतील मंडळाचा रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव : गेल्या वर्षांपासून जगा सह देशावर ,राज्यांवर कोरोना रोगाचा मोठा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने याहीवर्षी लोकडाऊनचा निर्णय घेतला,परंतु या कालावधीत रक्ताचे संकलन मात्र अल्प होत असल्याने ते कमी झाले आहे, युवकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन रक्तदान करण्याचे आहवन सरकारने वेळोवेळी केले, या आवाहनाचा विचार करत मुंगी ( ता.शेवगाव) येथील निम्बाक संस्कृतीक कला व क्रीडा प्रतिष्ठाण आणि आद्य गणेश मंडळातील सुमारे तेवीस युवक कार्यकर्त्यांनी रक्तदान करत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कोरोना या महामारी काळात घायची काळजी त्यावरील उपाय आदी संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.औरंगाबाद येथील दत्ताजी भले रक्त केंद्र यांना यावेळी तेवीस युनिट रक्त डोनेट केले या दोन्ही मंडळातील कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेऊन समाजासाठीचे मोठे कार्य केल्याने या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे, यावेळी प्रा निलेश गायकवाड, अशोक गरड, नवनाथ गोर्डे, महेश गरड, अभिषेक आदमाणे, अमोल आदमाणे, सुरज राजेभोसले, दत्ता पानझडे, रामेश्वर दासपुते, ओंकार गायकवाड, शिवप्रशाद नरोटे, विजय होळकर आदींचा प्रामुख्याने सहभाग घेतला होता.

संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments