Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरी आणि बनावट पोलिस ओळखपत्र तयार केल्याचा गुन्हा दाखल

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - सुपा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील कुख्यात नयन तांदळे टोळी यांनी आणखी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. मोक्काच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना Dysp संदीप मिटके यांच्या निदर्शनास आले की, नयन तांदळे व त्याचे साथीदार यांनी चोरी आणि बनावट पोलीस ओळखपत्र बनवण्याचा गुन्हा केला आहे त्यावरून तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महेश साहेबराव ससे (वय 29 वर्ष धंदा व्यवसाय रा.झोपडी कॅन्टीन अहमदनगर) यांचे दि 21/12/2020 रोजी नगर मनमाड रोड वरील झोपडी कॅन्टीन जवळील येवले चहाचे दुकाना समोरून नयन तांदळे व त्याचे साथीदारांनी फिर्यादी हे चहा पिण्याकरिता गेले असता, त्यांचे खिशातील पाकीट चोरून त्यामध्ये असणारे फोटोचा गैरवापर करून बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून फिर्यादीची तसेच पोलिस विभागाची फसवणूक केली आहे. त्यानुसार नयन तांदळे टोळी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे.वरील दिलेल्या मजकूरचे फिर्यादी वरून अजून एक गुन्हा रजि. नंबर I 419/2021 भा.द.वि. कलम. 379,467,468,471,419,420,34 प्रमाणे दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास A.P.I.मुंडे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments