Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंढरपूर येथे हत्येचा प्रयत्न करून फरार असणारे आरोपी नगर शहरात जेरबंद ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे हत्येचा प्रयत्न करून फरार असणारे सराईत गुन्हेगार अहमदनगर शहरातील मंगलगेट परिसरात पकडण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अभिषेक उर्फ निखील प्रताप गंगेकर (वय 26, अनिलनगर ता. पंढरपूर जि. सोलापूर) विवेक नागेश गंगेकर (वय 24, जुनीपेठ काशीकापडेगल्ली ता. पंढरपूर जि. सोलापूर) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हे अहमदनगर शहरात मंगलगेट परिसरात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने मंगलगेट येथे जाऊन ब्रिजा कार ( एमएच 26 बीसी 47 37) या गाडीसह अभिषेक व विवेक गंगेकर या दोघांना ताब्यात घेतले. दोघांना पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे सपोनि आर. ए. मगदूम यांच्या ताब्यात दिले. या आरोपींवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, हत्येचा प्रयत्न करणे, मारहाण करणे, गंभीर दुखापती करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पथकातील सफौ सोन्याबापु नानेकर, पोहेकाॅ संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, संदीप पवार, सचिन अडबल, रवी सोनटक्के, पोकाॅ आकाश काळे, जालिंदर माने, रोहित मिसाळ, चापोना भरत बुधवंत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments