Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेशनमालात तफावत, वाळकी रेशनदुकान चालकावर गुन्हा दाखल ; पुरवठा अधिकारी शिकारे यांची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- स्वस्त धान्य दुकानातील मालात तफावत आढळून आल्या असता, नगर तालुक्यातील वाळकी येथील रेशन दुकान चालकावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. अरुण शिवाजी बोठे असे त्या रेशन दुकानचालकाचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील वाळकी येथील रेशनदुकानात दि.२६ मे ला पुरवठा अधिकारी वैशाली शिकारे यांनी रेशन माला तपासणी केली असता, गहू-3691 किलो कमी ,तांदूळ -4473 किलो कमी,साखर - 67.5 किलो जास्त,मका- 236 किलो जास्त,चना डाळ -248 किलो कमी अशी तफावत रेशनमालात आढळून आली. याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना माहिती दिली. घटनास्थळी श्री सपोनि सानप यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल होऊन तेथील रेशनदुकानाचा पंचनामा केला. पुरवठा अधिकारी वैशाली शिकारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरनं व कलम 273/2021 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 3,अत्यावश्यक वस्तू अधिनियम 5 प्रमाणे रेशनदुकानदार अरुण बोठे याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments