Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

व्यापाऱ्याचे अपहरण करुन लुटमार करणारा आरोपी जेरबंद , स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - व्यापाऱ्याचे अपहरण करुन निर्जण ठिकाणी नेऊन लुटमार करणारा आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेची पथकाला यश आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, १६ मे २०२१ रोजी दुपारच्या वेळी फिर्यादी नहूश सुनिल पडतूरे ( रा . गायकवाड मळा , चिंतामणी हॉस्पिटलमागे , सावेडी , अहमदनगर) हे गुरुदत्त लॉन , पंपीग स्टेशन रोड , सावेडी , अहमदनगर येथे त्यांचे मित्रासमवेत गप्पा मारत बसलेले असताना कोणीतरी अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना फोन करुन तुमचे फ्लॅटचे थकलेले भाडे देतो असे म्हणून फिर्यादी यांना परिचय हॉटेल जवळ , सावेडी येथे बोलावून घेऊन तेथून फिर्यादी यांना मोटार सायकलवरुन बु-हाणनगर रोडवरील स्मशानभुमीजवळ नेवून तेथे फिर्यादीस मारहाण करुन फिर्यादीजवळील चांदीचे ब्रेसलेट , सोन्याची अंगठी , मोबाईल , खिशातील पाकीट असा ४० हजार ३०० रु . किं . चा ऐवज बळजबरीने चोरुन नेला होता . सदर बाबत फिर्यादी यांनी तोफखाना पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं . १ ४०१/२०२१ , भादवि कलम ३६४ ( अ ) , ३ ९ ४ , ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अनिल कटके हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोनि श्री कटके यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली कि , सदरचा गुन्हा हा महेश मिसाळ , रा . माणिक चौक , अहमदनगर याने केलेला असून सदर आरोपी हा जिल्हाधिकारी कार्यालय , अहमदनगर परिसरामध्ये फिरत आहे . अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे , संदीप घोडके , पोना संदीप पवार , सुनिल चव्हाण , पोकॉ योगेश सातपुते अशांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालय येथे जावून मिळालेल्या माहितीवरुन आरोपीचा शोध घेऊन आरोपी महेश गोविंद मिसाळ ( रा . माणिक चौक , अहमदनगर ) यास ताब्यात घेवून त्यास तोफखाना ठाण्यात हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही तोफखाना पो.स्टे . करीत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटिल, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments