Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्र सरकारचा अतिआत्मविश्वास जनतेसाठी ठरतोय प्राणघातक : राष्ट्रवादी काँग्रेस


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशाला बसला आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्यामुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने देशाचे वातावरण चिंतामय आहे. देशात मे महिन्याच्या सुरुवातीला ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होतो, यानंतर एप्रिल-मे या महिन्यांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकदम वाढली. त्यात फक्त गेल्या २४ दिवसांमधील कोरोना मृत्यूची संख्या ९० हजार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र सरकारने लसींची निर्यात केली परिणामी देशात मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.


केंद्र सरकारचा ओव्हर कॉन्फिडन्स जनतेसाठी प्राणघातक ठरतोय अशा शब्दात राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे. देशात कोरोना मृत्यूंचा आकडा तीन लाखांवर गेला आहे. दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेतही केंद्राने कुंभ मेळा, निवडणुका जाहीर केल्या. राज्यांनी लॉकडाऊन शेवटचा पर्याय म्हणून पाहावा, असे जाहीर केले. मोठ्या प्रमाणात लशी निर्यात करण्यात आल्या आहेत. परिणामी देशात मृत्यूचा आकडा सातत्याने वाढत गेला असून ५ एप्रिल २०२१ रोजी देशातील एकूण मृत्यू १ लाख ६५ हजार १०१ होते. त्यानंतर पुढच्या २५ दिवसांत म्हणजे १ मे रोजी देशातील एकूण मृत्यूंची संख्या २ लाख ११ हजार होती. आज देशातील एकूण मृत्यूंचा आकडा ३ लाख ३ हजार ७२० वर पोहोचलाय याचाच अर्थ मागच्या २४ दिवसांत देशात ९० हजार मृत्यू झाले आहेत.

Post a Comment

0 Comments