Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

देशात म्युकोरमायकोसिस उपचारासाठीच्या इंजेक्शनचा तुटवडा, २५ हजारांचे इंजेक्शन ७५ हजारांना विकले

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
हैद्राबाद-कोरोनातून (Covid 19) बऱ्या झालेल्या रुग्णांना म्यूकोरमायकोसिस (Mucormycosis) हा आजार होत आहे. म्यूकोरमायकोसिस  हे एक फंगल इंन्फेक्शन आहे. कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या रुग्णांना याचा सर्वाधिक धोका संभवतो आहे. याआधीही कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार आणि राजकारण केल्याचे समोर आले होते. म्यूकोरमायकोसिस या झपाट्याने संक्रमित होणाऱ्या आजारावरील इंजेक्शनचा देशात तुटवडा आहे. या इंजेक्शनची किंमत २५ हजार रुपये आहे. मात्र त्याचा तुटवडा जाणवत असल्याने त्यात काळाबाजार करुन ७५ हजारांना हे इंजेक्शन विकल्याचे हैद्राबादमधून समोर आले आहे.

म्यूकोरमायकोसिस आजारावर उपचार करण्यासाठी केवळ २ ते ४ आठवड्याचा खर्च तब्बल १५ ते २० हजार रुपये इतका आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये याचा धोका प्रामुख्यांने आढळत आहे. ओपोलो रुग्णालायाचे डॉक्टर कोका रामबाबू यांनी सांगितल्यानुसार, म्यूकोरमायकोसिससाठी अँम्फोटेरिसिनचे (Amphotericin) इंजेक्शन मिळवणे महत्त्वाचे आहे मात्र ते मिळवणे सोपे नाही. त्याचप्रमाणे या आजारात वापरली जाणारी इतर औषधे मिळणेही कठीण आहे.
म्यूकोरमायकोसिसवर प्रभावी ठरणारी औषधांच्या कंपन्यांकडे कच्चा माल उपलब्ध नाही. यावर इंजेक्शन आणि औषधांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळेच उपलब्ध असलेली औषधे ज्यादा भावात विकून काळाबाजार सुरु आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार म्यूकोरमायकोसिस या आजारी अत्यंत दुर्मिळ आहे. मात्र येत्या काही काळात याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नाकातून याचा संसर्ग होऊन ते डोळ्यांपर्यंत जाते आणि तिथून संसर्ग मेंदूपर्यंत गेल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे डॉक्टरही या आजावरील औषधांचा वापर करण्यावर विचार करत आहेत.

Post a Comment

0 Comments