Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगारात वृद्ध दाम्पत्यांनी एकमेकांच्या हातावर वार करून नस कापून टाकण्याची धक्कादायक घटना

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरातील घटना. आपल्याला रोग झाले आहे.आपला जगून तरी काय उपयोग असे म्हणत एका वृद्ध दाम्पत्यांनी एकमेकांच्या हातावर वार करून नस कापून टाकण्याचा धक्कादायक प्रकार काल भिंगार आलमगीर रोड येथील द्वारकाधीश कॉलनी परिसरामध्ये घडला.या प्रकरणांमध्ये संबंधित वृद्ध हा मयत झाला असून त्याची पत्नी सध्या उपचार घेत आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेत उषन्‍ना रामन्ना वरगंठे ( वय 78 ) हे मयत झाले आहे.तर त्यांची पत्नी शकुंतला उषांन्ना वरगंठे (वय 69 वर्ष) यांच्यावर उपचार सुरू आहे.
बाबत मिळालेलीअशी की येथील द्वारकाधीश कॉलनी परिसरामध्ये हे जोडपं गेल्या अनेक वर्षापासून राहत आहे. त्यांना दोन मुले असून एक मुलगा सावेडी परिसरामध्ये राहत असून एक मुलगा पुणे येथे राहत आहे. उषन्ना वरगुंठे हे कॅन्सरने आजारी होते. तर त्यांची पत्नी शकुंतला हिला हृदयविकाराचा तसेच अन्य आजार सुद्धा आहेत. गेल्या काही वर्षापासून ते दोघेही उपचार घेत होते.आपल्याला रोगराई झालेली आहे.आपल्याला दोघांना जगून काय उपयोग असे म्हणत संबंधित पुरुषाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.या चिठ्ठीमध्ये त्याने त्याच्या आजाराची सर्व माहिती देऊन आपण जीवनाला कंटाळलो आहे असे म्हणत त्या वृद्धाने आपल्या पत्नीच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले व त्यानंतर त्याने स्वतःच्या हातावर वार करून ते दोघेही घरातच कोसळले. आजूबाजूच्या लोकांना याची माहिती मिळाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख हे पथकासह त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी या दाम्पत्याला जिल्ह्यात शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता यामध्ये उषन्ना वरगुंठे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. भिंगार पोलिसांनी महिलेला वेळेवर रुग्णालयात घेऊन गेल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत.तिच्यावर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे.घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे,भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष कुमार देशमुख. उपनिरीक्षक बी.एस.देशमुख, पोना राजेंद्र सुद्रिक, राहुल द्वारके धामने यांनी भेट देऊन पंचनामा केला.पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवकुमार देशमुख हे करत आहे.

Post a Comment

0 Comments