Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाजगी हॉस्पिटमधील आयसीओमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करा - श्रीनिवास बोज्जा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच हॉस्पिटलमधील बेड फुल असल्याचे सांगण्यात येते वास्तविकपाहता याची सत्यता पाळण्याकरिता तसेच पेशंट ची देखभाल व्यवस्थित होते की नाही याची शहानिशा होणेसाठी खाजगी हॉस्पिटल मधील आय सी ओ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी मा राजेश टोपे, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे केली आहे.

साध्यच्या परिस्थितीत काही हॉस्पिटल मध्ये सेवाभावी काम दिसून येतेय तर काही हॉस्पिटल मध्ये फक्त व्यवसायिकरण असल्याचे दिसून येत आहे. कोविड पेशंट ऍडमिट केल्यानंतर हॉस्पिटल कडून कोणतीही कल्पना दिली जात नाही फक्त उपचार चालू आहे परंतु सिरीयसआहे,असेच सांगितले जाते. यासाठी जर आय सी ओ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले व त्याचे प्रक्षेपण हॉस्पिटलच्या आवरा मध्ये मोठया स्क्रीन वर दाखवील्यास ज्या पेशंट चे नातेवाईक आहेत त्यांना त्यांच्या पेशंट ची सत्य परिस्तिथी कळू शकते व त्यामुळे पेशंट चे नातेवाईकांना दिलासा मिळेल. पूर्वी हॉस्पिटल मध्ये कोणत्या आय सी ओ मधील बेड वर कोणते पेशंट आहे याचे फलक हॉस्पिटलचे आवरा मध्ये लावले जात असे, परंतु आता असे कोणतेही फलक हॉस्पिटलचे आवारामध्ये दिसून येत नाही जर असे फलक लावण्याची सक्ती हॉस्पिटलला केली तर पेशंटच्या नातेवाईकाना कळेल आपले पेशंट कुठे आहे तसेच हॉस्पिटल मध्ये बेडही शिल्लक आहे किंवा नाही याचीही माहिती प्रशासनाला मिळेल. 
या साठी प्रशासनाने तातडीने आदेश करून सर्व खाजगी हॉस्पिटल ने त्यांचे आय सी ओ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करून त्याचे प्रक्षेपण हॉस्पिटल चे आवरा मधील मोठया स्क्रीन वर करावे तसेच कोणत्या आय सी ओ मधील बेड वर कोणते पेशंट आहे याचे माहितीफलक लावणे सक्तीचे करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments