Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नास यश;शिवाजी नगर बालाजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लसीकरण केंद्र सुरू

 


लसीकरणापासून प्रभाग 8 मधील नागरिक वंचित राहणार नाही-नगरसेवक शाम नळकांडे 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर लसीकरण हाच एक पर्याय आहे यासाठी लवकरात-लवकर कोरोना प्रतिबंधकलसीचा डोस देणे हे गरजेचे आहे.कोरोना संसर्ग विषाणूंमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढत असल्यामुळे संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली आहे. यासाठी कल्याण रोड परिसरामध्ये नवीन उपकेंद्र सुरू व्हावे यासाठी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे पाठपुरवठा केल्याने लसीकरण केंद्र सुरू झाले आहे.तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक शाम नळकांडे यांनी केले.
नगरसेवक नगरसेवक शाम नळकांडे(आप्पा) यांच्या प्रयत्नातून कल्याण रोडवरील बालाजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले यावेळी परुनाथ ढोकळे, भगवान काटे, अविनाश लबडे,उत्तम खोडदे, मुकुंद बेलेकर, सुशांत शिंदे,स्वप्निल गडाख, प्रशांत शिंदे,अंकुश साबळे,रामा गुंडू,पवन लोखंडे, विकास ताकपिरे,उमेश कटारिया,अमोल बागल,गोरख ताकपिरे,बाळासाहेब नळकांडे, आरोग्य सेविका रोहिणी सानप, मीनाक्षी खोडदे,कारण शिंदे, अश्विनी पाटेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक शाम नळकांडे म्हणाले की, आयुक्त शंकर गोरे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी कल्याण रोड येथे सुरू केलेल्या लसीकरणं केंद्रास मंजुरी दिली आहे आज पासून कल्याण रोड परिसरातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. नागरिकांनी माझ्या कार्यालयात आधार कार्डची झेरॉक्स आणून द्यावी जसा- जसा लसीचा पुरवठा होईल तसे लसीकरण केले जाईल तसेच नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत लसीकरणाचा लाभ घ्यावा, कल्याण रोड परिसरातील कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहणार नाही असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments