Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्पर्शाने पसरत नाही, विविध रंगात वर्गीकरण करणे चुकीचे- आरोग्य मंत्रालय

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
देशात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वाधिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशी संसर्ग आढळून येत आहे. परंतु हा आजार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरणारा नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शरारीत रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यास अनेक कोरोनामुक्त रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. 
म्युकरमायकोसिस या आजारामुळे व्यक्तीच्या साइनल, राइनो ऑर्बिटल आणि मेंदूवर विपरित परिणाम होत आहेत. व्यक्तीच्या शरीरातील लहान आतड्यातही याचा संसर्ग होत आहे. मात्र या आजाराला वेगवेगळ्या रंगांची ओळख देणे चुकीचे असल्याचे मत केंद्रीय आरोग्य यंत्रणेने व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments