Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शहर विकासा कामांमुळे उद्योगाला चालना-आ. संग्राम जगताप

👉प्रभाग 11 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी पाठपुरवठा सुरू आहे. कोरोना संकटकाळामुळे राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असतानाही नगर शहराच्या विकासासाठी निधी प्राप्त करीत आहे. सोलापूर रोड,कानडे मळा,नगर कॉलेज,CSRD पर्यंतचा रस्त्यासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून लवकरच या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरनाचे काम सुरु होणार आहे. नगर शहराला जोडणाऱ्या डीपी रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचा दळणवळनाच प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे ग्रामीण भागातील जनता शहरात आपले व्यवहार करण्यासाठी येतील व शहरातील बाजारपेठा विकसित होतील. सर्व नगरसेवकांच्या टीम वर्क मुळे चांगले काम सुरू आहे. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी प्रभाग क्र.11 मध्ये विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निधी प्राप्त करून घेतला आहे. शहर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्र.11 मध्ये कानडे मळा येथील विद्यासागर उकॉलनी मध्ये आ.संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकासनिधी मधून व स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी छबुराव कांडेकर,किरण कटारिया, महादेव कराळे, धर्मा कारंडे,ललित खाडे,किसन सानप,सुनील वारे,आकाश तोंडे,बंटी खैरे,कमळ लोखंडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती अविनाश घुले म्हणाले की,प्रभाग क्रमांक 11 मधील विविध भागातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहोत विद्यासागर कॉलनीमध्ये 20 वर्षी नंतर प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लावले आहे.आ. संग्राम जगताप यांच्या मुळे प्रभागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी मोठा निधी प्राप्त होत आहे.विकासाचा नागरिकांना दिलेला शब्द आता पूर्ण करत आहे, शहर विकासासाठी आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहे असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments